28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषदिल्लीच्या हवेची गुणवत्ता 'गंभीर'; राजधानीत दाट धुक्याची चादर

दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ‘गंभीर’; राजधानीत दाट धुक्याची चादर

अनेक भागात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४०० च्या पुढे

Google News Follow

Related

राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीत अजूनही हवेच्या पातळीत सुधारणा होताना दिसत नाही. दिल्लीची हवा अजूनही विषारी असून शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता २४ तासांचा सरासरी AQI हा ३७१ नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील बहुतेक भाग धुक्याच्या दाट चादरीमध्ये लपेटला गेला आहे.

अनेक भागात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४०० च्या पुढे गेला आहे, जो ‘गंभीर’ श्रेणीत येतो. याशिवाय, बहुतांश भागात प्रदूषणाची पातळी ‘अत्यंत खराब’ नोंदवण्यात आली आहे. जहांगीरपुरी येथे २४ तासांचा सरासरी AQI ४२६ सकाळी ७ वाजता सर्वांत जास्त प्रदूषित असल्याचे नोंदवले गेले आहे.

CPCB च्या आकडेवारीनुसार, सर्वोत्कृष्ट AQI लोधी रोडचा होता जो २६० होता. तसेच ज्या भागात AQI ने सकाळी ६ पर्यंत ४०० ओलांडले आहेत त्यात आनंद विहार (४०८), बवाना (४०९), जहांगीरपुरी (४२४), मुंडका (४०१) यांचा समावेश आहे. नेहरू नगर (४०८), शादीपूर (४०१) आणि वजीरपूर (४१२). याशिवाय बहुतांश भागात AQI ३४० ते ४०० दरम्यान राहिला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना घेवून जाणाऱ्या वाहनावर हल्ला, ५० जण ठार!

अखिलेश यादवांनी खोटा व्हिडीओ केला शेअर

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

महायुतीला स्पष्ट बहुमत, १७५ जागा मिळतील!

या आठवड्याच्या अखेरीस हवेत थोडीफार सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली असून GRAP चा चौथा टप्पाही कार्यान्वित करण्यात आला आहे. वायू प्रदूषणावर दैनंदिन नजर ठेवण्यासाठी मॉनिटरिंग सेंटर्स तयार करण्यात आली आहेत. ही केंद्रे एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) च्या रीडिंगद्वारे डेटा प्रदान करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा