पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ ते २१ तारखेपर्यंत नायजेरिया, ब्राझील आणि गयाना दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गयानाकडून सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान यांना गयाना आणि बार्बाडोस या दोन देशांनी त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज गुरुवारी (२० नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांच्या हस्ते सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वीचं डोमिनिका या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला होता. त्यानंतर गयाना आणि बार्बाडोस या देशांनीही सर्वोच्च पुरस्काराची घोषणा केली. गयानाचे राष्ट्रपती इरफान अली यांच्या हस्ते ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आला.
हे ही वाचा :
पुतीन यांचे गुरू म्हणतात, भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा, संस्कृतीत जगाला नवी दिशा देण्याची क्षमता
अखिलेश यादवांनी खोटा व्हिडीओ केला शेअर
भाजपला मतदान करणार होती म्हणून तिची हत्या केली
जितेंद्र आव्हाडांनी फ्रान्सला जाऊन निवडणूक लढवावी
आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आले आहेत, ज्यात ‘ऑर्डर ऑफ झायेद’, ‘ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज सौद’, ‘लिजन ऑफ मेरिट’ या सन्मानांचा समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर हा प्रसंग शेअर केला आणि लिहिले की, “‘ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान केल्याबद्दल मी राष्ट्रपती डॉ. इरफान अली, सरकार आणि गयानाच्या लोकांचा आभारी आहे. हा सन्मान भारतीय जनतेचा आहे. भारत-गियाना मैत्री आगामी काळात आणखी घट्ट होवो.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गयाना दौऱ्यामुळे दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत. बुधवारी (१९ नोव्हेंबर) भारत आणि गयाना यांच्यात १० करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्य, शेती आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्य, UPI सारख्या पेमेंट सेवा या संदर्भात करार करण्यात आले आहेत.
I am grateful to President Dr. Irfaan Ali, the Government and the people of Guyana for conferring ‘The Order of Excellence.’ This honour belongs to the people of India.
May the India-Guyana friendship grow even stronger in the times to come.@DrMohamedIrfaa1@presidentaligy pic.twitter.com/Tm9OfFxwyo
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024