जम्मू- काश्मीरमधून दहशतवादी हल्ल्यांच्या घटना आणि घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. अशातच सुरक्षा यंत्रणा आणि लष्कर अलर्ट मोडवर असताना आता दहशतवादी घुसखोरी प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएनने जम्मू- काश्मीरच्या काही भागांमध्ये कारवाई केली आहे. दहशतवाद्यांचे धागेदोरे असणाऱ्या भागांमध्ये छापेमारी मारण्यात आली आहे.
एनआयएच्या पथकाने गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी पोलीस आणि निमलष्करी दल सीआरपीएफच्या मदतीने जम्मू- काश्मीरमध्ये आठ ठिकाणी छापे टाकले. रियासी, डोडा, उधमपूर, रामबन आणि किश्तवाड जिल्ह्यांमधील काही परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. एकाचवेळी आठ ठिकाणी कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांमध्ये होत असलेल्या घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची गंभीर दखल घेत एनआयएने ही कारवाई केली आहे.
#WATCH | J&K: The National Investigation Agency (NIA) is conducting raids at multiple locations in Reasi, Doda, Udhampur, Ramban & Kishtwar in connection with a case involving terrorist infiltration. Raids are being conducted at 8 locations.
Visuals from Bhaderwah where a raid… pic.twitter.com/1TqnbrXV2u
— ANI (@ANI) November 21, 2024
मागील आठवड्यातही एनआयएने कारवाई करत दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद याच्या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्या खात्यात १५ लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे लक्षात आले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान नावाच्या फरारी गुन्हेगाराने १५ लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्याचे स्पष्ट झाले होते. एनआयआयएच्या पथकाने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांची चौकशी केली होती.
हे ही वाचा:
सिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह
सिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सुजित पाटकरांचा जामीन फेटाळला
वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…
जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये १८ ऑक्टोबर रोजी एका मजुराची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर २० ऑक्टोबर रोजी गांदरबलमधील बांधकाम कंपनीच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात डॉक्टरांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. २४ ऑक्टोबर गुलमर्गजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते, तर दोन घुसखोरांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते. त्यानंतर जम्मूच्या अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते.