23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामागौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप

गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप

सौर ऊर्जा करार मिळवण्यासाठी दिली होती लाच, असा दावा

Google News Follow

Related

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर कथित अब्जावधी डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. गौतम अदानी आणि त्यांच्या सहयोगींवर २६५ दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अमेरिकेतील पूर्व न्यूयॉर्क जिल्ह्याचे यूएस ऍटर्नी ब्रेऑन पीस यांनी सांगितले की, अदानी आणि इतर आरोपींनी सौर ऊर्जा करार मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना कोट्यवधी डॉलर्सची लाच दिली. तसेच, हा कट अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवला.

गौतम अदानी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप होत आहे. अदानी, अदानी यांचे पुतणे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह आणि ऍज्युर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह सिरिल कबानेस यांच्यावरही आरोप ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी सौर ऊर्जा वितरीत करण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २,०२९ कोटी रुपयांची (२६५ दशलक्ष डॉलर्स) लाच देऊ केली. यावर अदानी समूहाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकन सिक्युरिटीज ऍण्ड एक्स्चेंज कमिशनने (एसईसी) बुधवारी अदानी यांच्यासह इतरांवर सिक्युरिटीज आणि वायर फ्रॉड आणि सिक्युरिटीज फ्रॉड करण्याचा कट रचल्याचा आरोप लावला आहे. हे आरोप कोट्यवधी डॉलरच्या योजनेशी संबंधित आहेत. खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करून अमेरिकी गुंतवणूकदार आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भारत सरकारने अदानी ग्रीन आणि ऍज्युर पॉवरला दिलेल्या अब्जावधी डॉलरच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा फायदा घेण्यासाठी ही लाच देण्याची योजना आखण्यात आल्याचा आरोप एसईसीने केला आहे. एसईसीच्या तक्रारीत म्हटले आहे की, हे लोक फेडरल सिक्युरिटीज कायद्यांच्या फसवणूक विरोधी तरतुदींचे उल्लंघन करत आहेत. एसईसीच्या निवेदनानुसार, या योजनेदरम्यान अदानी ग्रीनने अमेरिकन गुंतवणूकदारांकडून १७५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे १४५० कोटी रुपये) पेक्षा जास्त रक्कम गोळा केली. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये अ‍ॅज्युर पॉवरचे शेअर्स ट्रेड करत होते.

हे ही वाचा:

सिंधमधून १० वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण आणि धर्मांतर करून केला निकाह

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सुजित पाटकरांचा जामीन फेटाळला

वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा १-० असा केला पराभव!

न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट ऍटर्नी ऑफिसने गौतम अदानी, सागर अदानी, काबानीज, अदानी ग्रीन आणि ऍज्युर पॉवरशी संबंधित इतरांविरोधात फौजदारी आरोप दाखल केले आहेत. फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्टचे (एफसीपीए) उल्लंघन करून लाचेचा कट रचल्याचा आरोप आहे. २०२० ते २०२४ या कालावधीत अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त लाच दिल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लाच देण्यामागे सौर ऊर्जा प्रकल्प मिळविण्याचा हेतू होता. यामुळे पुढील २० वर्षांत २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा