उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला असून हा वाद वाढत असल्याचे दिसत आहे. शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करत हिंदू बाजूने सर्वेक्षणासाठी न्यायालयात दाद मागितली होती, न्यायालयाने हिंदू बाजूने केलेल्या मागणीला हिरवा कंदील देत सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहे. न्यायालयाने कमिशनरची नियुक्ती करून २९ नोव्हेंबरपर्यंत अहवाल मागवला आहे.
हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांनी तेथे मंदिर अस्तित्वात असल्याचा दावा मांडला होता, त्यावर सुनावणी होऊन बुधवारी (१९नोव्हेंबर) न्यायालयाने आयुक्तांना संभलच्या शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच सर्वेक्षण पथक संभलच्या शाही जामा मशिदीत पोहोचले. या वेळी अधिवक्ता विष्णू शंकर जैन हे डीएम आणि एसपींसह मोठं पोलीस फौजफाटा घेऊन तेथे पोहोचले होये. मात्र त्यांना मशिदीत प्रवेश नाकारण्यात आला.
दरम्यान, सपा खासदार झियाउर रहमान बारक हे ही शाही जामा मशिदीत पोहोचले होते. संभलचे आमदार इक्बाल महमूद यांचा मुलगा सुहेल इक्बालही शाही जामा मशिदीत पोहचले होते. पाहणी पथक आल्याने मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली होती. याचं पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!
बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल
विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
तावडे यांनी कुठलेही पैसे वाटलेले नाहीत!
माहितीनुसार, हिंदू पक्षाने संभल जिल्ह्यातील प्राचीन जामा मशिदीवर भगवान विष्णूचे हरिहर मंदिर असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने वकिल आयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले असून, त्यांना सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा लागेल.