शिवसेना उबाठा गटाच्या महिला नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यावर संदीप देशपांडे यांनी प्रत्युतर देत किशोर पेडणेकर या डोक्यावर पडल्या असल्याचे म्हटले आहे. तसेच वरळीतील लोकं यांचे पैसे घेतील पण मतं देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रत्नसिंधू इमारतीमध्ये संदीप देशपांडे आले आणि त्यांनी बैठक घेतली, हे सर्व सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. इमारतीमधील २२ व्या माळ्यावरती देशपांडे लाडू खायला गेले होते का?, रात्र वैऱ्याची असून ठीकठिकाणी अशा घटना घडत असून, पैसे वाटण्याचे काम सुरु आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
हे ही वाचा :
शशी थरूर म्हणतात भारताच्या राजधानीचे ठिकाण बदला
काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!
क्षितीज ठाकूर, हितेंद्र ठाकूर यांच्याकडून आधी आरोप आणि नंतर तावडेंच्या गाडीचे सारथ्य
अनिल देशमुखांच्या गाडीवरील हल्ला म्हणजे सहानुभुती मिळवण्यासाठीचा प्रयत्न
यावर उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, डोक्यावर पडलेल्या माणसांकडे लक्ष देण्याचे काम नाही. निवडणूक आयोगाने कोणाच्या घरी जाऊ नये, अशी माझ्यावर कोणती बंदी आणलेली नाही, त्यामुळे किशोर पेडणेकर यांनी चहा प्यायला बोलावले तरी मी त्यांच्या घरी जाईन.
ते पुढे म्हणाले, आदित्य ठाकरेंचा पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करत आहेत. उबाठाचे आमदार सचिन आहिर आणि सुनील शिंदे हे काल वरळी कोळीवाड्यात फिरत होते, यांच्याकडे पहिला त्यांनी लक्ष द्यावे. तसेच वरळी लोकं यांच्यावर नाराज आहेत, त्यामुळे यांचे पैसे घेतील पण मतं देणार नाहीत, असे संदीप देशपांडे म्हणाले.