निवडणुकीचा माहौल आहे, या काळात खऱ्या खोट्या बातम्या व्हायरल होत असतात. १९९२ च्या दंगलींतील सहभागाबाबत हळहळ व्यक्त करणारी, माफी मागणारी उद्धव ठाकरे यांची बातमी तशीच व्हायरल झाली. ही बातमी भाजपा नेते नितेश राणे यांच्यासह अनेकांनी एक्सवर पोस्ट केली. तशी ती आमचे मित्र पत्रकार सोमेश कोलगे यांनीही केली. उबाठा शिवसेनेचे नेते नितेश राणेंना जाब काय विचारतील? त्यांनी सोमेशला टार्गेट केले. ही बातमी पोस्ट करताना त्यांनी सोशल मीडिया हा सोर्स असल्याचे स्पष्ट केले होते. सोमेश यांनी पोस्ट केलेली ही बातमी फेक आहे, असा खुलासा उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी केला. मात्र हेच नेते उद्धव ठाकरे हे वोट जिहादचे सिपहसालार आहेत, हे सज्जाद नोमानीचे म्हणणे फेटाळत नाहीत. हिंदू समाजाला गहाण ठेवणाऱ्या उमेला बोर्डाच्या १७ मागण्याही फेटाळत नाहीत. ते का फेटाळत नाहीत ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
लोक एका आयुष्यात स्वत:च्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु यशस्वी होतातच असे नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललेच, बापाचेही बदलले. त्यांना हिंदुहृदयसम्राट वरून थेट जनाब बनवले. पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक करणाऱ्या राहुल गांधींचे जोडे डोक्यावर घेतले. कधी काळी सामनामध्ये ज्यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे असा केला जात होता. शिवसैनिकही खाजगीत ज्यांना साहेब किंवा बाळासाहेब म्हणायचे त्या शिवसेनाप्रमुखांचा बाल ठाकरे असा उल्लेख प्रियांका
वाड्रा जाहीर भाषणात करतात आणि उद्धव ठाकरे ते ऐकतात हे असे दिवस उद्धव ठाकरेंनी पक्षावर आणले आहे. हे उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्व आहे, त्यामुळे १९९२ च्या दंगलीतील सहभाग ही चूकच, माफ करा… झाली हे शीर्षक असलेली
बातमी त्यांना अगदी व्यवस्थित चिकटते.
ही बातमी फेक असल्यावरून उबाठाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आकांड तांडव करतायत, याच बातमीवरून आदित्य ठाकरे कोलगे यांना कोलतायत. त्यांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. ही सगळी नाटकं कशाला? सोमेश
हा पाकीट पत्रकार नाही याचा बहुधा ठाकरेंना राग असावा. कोविडच्या काळातील ठाकरे सरकारच्या पापांवर तो मोठ्या हिमतीने व्यक्त झाला आहे. ही बातमी फेक आहे, हे सांगताना ‘ठाकरेंना १९९२ च्या दंगलीतील सहभाग चूक वाटण्याचे काहीच कारण नाही आणि त्याबाबत माफी मागण्याचा प्रश्न नाही’, असा दणदणीत खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला असता तर ते ठाकरे नावाला साजेसेही होते. पत्रकारितेच्या नावाने ठणाणा करण्याची गरज नव्हती. फेक बातम्यांबाबत ठाकरेंनी बोलून नये, तुमच्या घरच्या मुखपत्रात कार्यकारी संपादकांना किती वेळा कोर्टात माफी मागावी लागली याचा हिशोब लोकांनी मांडणे सोडून दिले आहे.
सोमेश यांच्या विधानाबाबत खुलासा करणारे सज्जाद नोमानी याच्या त्या व्हायरल व्हीडियोबाबत खुलासा करीत नाहीत, याचा अर्थ नोमानी म्हणालाय ते यांना मान्य आहे. तो जाहीरपणे म्हणालाय की ‘उद्धव ठाकरे वोट जिहाद के सिपहसालार है.’ हे वाक्य महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांच्या कानात उकळत्या शिस्या सारखे शिरले. शिवसेनाप्रमुखांचा लेक नोमानी याच्या वोट जिहादचा सिपहसालार? आदित्य ठाकरेंनी करावा की खुलासा, फोडावे की नोमानीचे थोबाड. तेव्हा आदित्य यांच्या तोंडून डरकाळी काय साधे म्यॉव सुद्धा बाहेर पडत नाही. हिंदू समाजाला विकणाऱ्या ऑल इंडीया उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या आहेत. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देणारे काँग्रेसचे पत्रही व्हायरल झाले आहे, आदित्य ठाकरे तुम्ही तेव्हा तोंडात बोळा कोंबलात. मौन धारण करत मम म्हटलेत.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांच्या गाडीवरील हल्ला म्हणजे सहानुभुती मिळवण्यासाठीचा प्रयत्न
काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!
वॉन्टेड नक्षल नेता विक्रम गौडा चकमकीत ठार
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना पुन्हा मुदतवाढ ?
कोणत्या आहेत या मागण्या, लव्ह जिहादला प्रोत्साहन भत्ता, लव्ह जिहादच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई, मुस्लिमांची एट्रोसिटी एक्टपासून सुटका, मुस्लीम महिलांच्या गर्भारपणाचा संपूर्ण खर्च सरकार करावा, वक्फ बोर्डाला मोकळे रान द्यावे. याचा अर्थ भविष्यात मुस्लिमांची महाराष्ट्रात बहुसंख्या होईल, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची, मंदीरांची जमीन वक्फच्या ताब्यात जाईल, अशी व्यवस्था मुस्लीम नेतृत्वाला हवी आहे. गेल्या दहा वर्षातील सगळ्या मुस्लीम दंगेखोरांची सुटका त्यांना हवी आहे, त्यांना गड किल्ल्यांवर मशिदी उभारण्याची आणि रस्त्या रस्त्यावर मजारी उभारण्याची मुभा हवी आहे.
सरकारने मुस्लिमांची मतं घ्यावी, सत्तेवर यावे आणि पाच वर्षे आमची धुणीभांडी करावी, हिंदुंवर वरवंटा चालवावा, एवढी मुस्लिमांची माफक अपेक्षा आहे. या सगळ्या मागण्यांचे पत्र फेक आहे, काँग्रेसने असे कोणतेही आश्वासन दिलेले नाही, दिले असले तर त्याला आमचे समर्थन नाही, हे आदित्य ठाकरेंनी जाहीर केले पाहिजे होते. ते त्यांनी केले नाही, याचा अर्थ या मागण्यांना त्यांचा पाठिंबा आहे. ठाकरेंना वोट जिहादचे सिपहसालार म्हणणे त्यांना मान्य आहे. एका साधारण मौलवीने ठाकरेंचा उल्लेख वोट जिहादच्या पालखीच्या भोयासारखा केला, त्याला आदित्य ठाकरे आक्षेप घेत नाहीत, याचा अर्थ न कळण्या इतका मतदार मूर्ख नाही. त्यामुळे कोलगे यांच्या पोस्टवरून उगाच साप साप म्हणून भुई थोपटणे
बंद करा. आदित्य या सगळ्यावर गिळून बसतात, त्याचा निषेध करत नाही. कोलगेंचा निषेध करतात, यातच सगळे आले.
तुम्ही तुमचे वर्तमान बदलले, भविष्यातही तुम्ही नोमानी यांचे जोडे उचलण्याचे राजकारण करणार आहात, परंतु तुमचा इतिहास कसा बदलणार? कोलगे याच्या सारखा धडाडीचा पत्रकारही तुमच्या माफीनाम्यावर विश्वास ठेवतो त्याला
कारणीभूत तुमचे कर्तृत्व आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)