महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवडीचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. आता २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान, शेवटच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांचा खरपूस समाचार घेतला. २०१९ पासूनच्या राजकीय घडामोडींसाठी उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची घाणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात २०१९ पासून जे काही झालं त्याला उद्धव ठाकरे नावाची व्यक्ती जबाबदार आहे. ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे म्हणाले की, एका बाईला तीन मुलं असतात. पहिल्या मुलाचं लग्न होतं. त्यावेळी सासू आणि सुनेचं भांडण होतं आणि मुलगा ते घर सोडून जातो. सगळे बोलतात नवीन सून आल्यानंतर भांडण झाली. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं लग्न होतं. दुसरी सून घरी येते. यावेळी दुसऱ्या सुनेचं देखील सासूसोबत भांडण होतं. तेही घर सोडून जातात. तिसरी सून येते, तो मुलगा देखील बायकोसोबत घर सोडून जातो. त्यानंतर लोकांना कळतं की, तीन सुना होत्या, त्यांच्यात प्रॉब्लेम नव्हता; तर सासूमध्ये प्रॉब्लेम होता. ती सासू म्हणजेचं उद्धव ठाकरे आहेत, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली.
“शिवसेनेची सासू बसली आहे, तिचा प्रॉब्लम आहे. जी मुले सोडून गेली त्यांचा प्रॉब्लेम नाही. सोडून गेलेले गद्दार नाहीत, तर खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंमुळे सगळे शिवसेनेतून बाहेर पडले, उद्धव म्हणजे खाष्ट सासू, ज्यांना सोडून सगळ्या सुना दूर गेल्या. या माणसाच्या वागणुकीमुळे नारायण राणे बाहेर पडले. त्यांनंतर मी बाहेर पडलो आणि आता एकनाथ शिंदे बाहेर पडले,” असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले.
हे ही वाचा :
औरंग्या फॅन क्लबकडे लोकांची पाठ, उबाठांना मिळतेय रिकाम्या खुर्च्यांची साथ!
दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!
मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!
ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!
“महाराष्ट्रातल्या मशिदींवरचे भोंगे मी खाली आणायला सांगितले. त्यानंतर भोंगे खाली आले पण, भोंगे बंद करतो पण हनुमान चालिसा म्हणू नका असं सांगितले. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. तेव्हा १७ हजार मनसे कार्यकर्त्यांवर सरकारने गुन्हे दाखल केले. मशिदींवरच्या लाऊड स्पिकरला संरक्षण देण्यात आलं. बाळासाहेबांनी अनेक सभांमध्ये सांगितलं होतं की मशिदींवरचे भोंगे खाली आले पाहिजेत. जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवे येतातच कसे? मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करता त्यावरुन तुमचा कल कळला आहे,” असं राज ठाकरे म्हणाले.