सभेदरम्यान नेत्यांचे स्टेज कोसळने हे काही नवीन नाही. अशा अनेक घटना राज्यासह देशभरात घडल्या आहेत. अशीच एक घटना शिवसेना उद्धव ठाकरेंच्या सभे दरम्यान घडली. काल ठाकरेंची ठाण्यात सभा पडली. यावेळी सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते स्टेजवर सरसावले. यामुळे स्टेजवर गर्दी झाली आणि स्टेजचा काही भाग खाली गेला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना निशाणा साधला आहे. स्टेज खचला, संकेत कळला?, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीटकरत म्हटले, जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्या ना दिला एक रुपया ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांची नुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड अडिच वर्षात लुटले खूप मोठे घबाड.
हे ही वाचा :
वाँटेड तस्कर हाजी सलीमच्या सिंडिकेटशी संबंधित चार हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त
रामेश्वरम कॅफे हल्ल्यातील आरोपींचे आयएसआयएसशी संबंध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नायजेरियात स्वागत
अल्ला हू अकबरचे नारे, घाणेरडे इशारे, थुंकण्याचा प्रयत्न अन खुर्च्या फेकल्या!
ते पुढे म्हणाले, त्यांचे एक टोक होते १०० कोटी ची ती वसूली या कफन चोरांना लाज नाही कसली काल उबाठा सेनेच्या सभेचा स्टेज ठाण्यात खचला यांच्या प्रत्येक पराभवाचा इतिहास ठाण्यानेच तर रचला. यांच्या भाषणांचा प्रभाव पहा किती? भाषण संपताच खचते पाया खालची माती, असे आशिष शेलार यांनी म्हटले.
स्टेज खचला! संकेत कळला?
जनता जेव्हा होती कोरोनात तडफडत
हे सगळे बसले होते नातेवाईकांना कंत्राटे वाटत
रिक्षा, टँक्सी, फेरिवाल्या ना दिला एक रुपया
ना आठवण झाली कधी लाडक्या बहिणींची
घरे भरली स्वतःची, दारुवाले आणि बिल्डरांचीनुसते सावत्र नाही हे भाऊ तर आहेत भलतेच लबाड
अडिच वर्षात…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 17, 2024