‘पुण्याच्या काही भागात एक विशिष्ट समाज हिंदू समाज आहे, त्यांनी मतदान केले भाजपाला. तर आम्हाला सवय आहे. इथे असंच मतदान होते. याचा अर्थ आम्ही त्याला जिहाद समजत नाही. वोट जिहाद हा शब्द वापरून फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी शप गटाचे नेते शरद पवार यांनी वोट जिहादवर आपली भूमिका मांडली.
एका मुलाखतीत वोट जिहादवरून प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी ब्राह्मण समाजाचे नाव न घेता त्यांना वोट जिहादची उपाधी लावली. एक विशिष्ट समाज भाजपाला मतदान करतो, असे सांगत याचा अर्थ वोट जिहाद आहे, असा तर्क त्यांनी मांडला.
सध्या वोट जिहाद हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचा फतवा काढला. महाविकास आघाडीच्या २६९ उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. त्याचा अर्थ भाजपाला मतदान करू नका असे त्यांनी म्हटलेले आहे.
यासंदर्भातील त्यांची एक व्हीडिओ क्लिपही व्हायरल होत असून त्यात ज्यांनी लोकसभा निवडणुकीत एनडीए किंवा भाजपाला मतदान केले त्या मुस्लिम मतदारांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यांच्याशी सगळ्या प्रकारचे व्यवहार बंद करण्यासही त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
बुलडोझर प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही गंभीर मुद्दे
ठाकरे गटाचे सर्व बालेकिल्ले, गड जनतेने उध्वस्त करून टाकलेत
व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार
शरद पवारांनी आता हा मुद्दा महाविकास आघाडीच्या विरोधात जात असल्याचे लक्षात घेता ब्राह्मणही वोट जिहाद करतात असा अर्थ काढल्याची टीका आता होत आहे.
याआधी, लोकसभा निवडणुकीत अनेक मुस्लिम संघटनांनी फतवे काढत महाविकास आघाडीच्या किंवा इंडी आघाडीच्या ठराविक उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मतदान झाले. आकडेवारीवरून मुस्लिम बहुल भागातून इंडी आघाडीच्या उमेदवारांना एकगठ्ठा मतदान झाले असल्याचे समोर आले आहे.