29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणसज्जाद नोमानींची धमकी, महाराष्ट्रात महायुतीला पराभूत करा, तर मोदी सरकार पडेल!

सज्जाद नोमानींची धमकी, महाराष्ट्रात महायुतीला पराभूत करा, तर मोदी सरकार पडेल!

व्हीडिओ झाला व्हायरल

Google News Follow

Related

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ता सज्जाद नोमानी हे गेल्या काही दिवसांत वोट जिहादची भाषा करताना दिसले आहेत. आता तर त्यांनी थेट महाराष्ट्रात महायुतीचा पराभव आवश्यक आहे तरच दिल्लीतील सरकार पडेल, अशा शब्दांत धमकी दिली आहे. त्यांचा हा व्हीडिओ भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी शेअर करत नोमानी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. सोशल मीडियात सध्या हा व्हीडिओ खूप चर्चेत आहे.

आशीष शेलार, विनोद तावडे यांनी हा व्हीडिओ शेअर करत नोमानी यांचे हे कारस्थान समोर आणले आहे. नोमानी या व्हीडिओत म्हणतात की, महाराष्ट्र सरकार आमचे लक्ष्य नाही तर दिल्लीतील सरकार आमचे लक्ष्य आहे. कारण महाराष्ट्र सरकार निवडणुकीत पुन्हा निवडून आले नाही तर दिल्लीतील सरकारही लवकरच पडेल. अर्थात, नोमानी हे दिल्लीतील नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्यासाठी मतदारांना प्रवृत्त करत असल्याचे दिसते आहे.

याआधी दोन दिवसांपूर्वी सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला आपले समर्थन असल्याचे जाहीर केले होते. महाविकास आघाडीच्या २६९ उमेदवारांना आपला पाठिंबा असल्याचे नोमानी यांनी जाहीर केले होते. मराठा व ओबीसी समाजातून जे ११७ उमेदवार आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे. त्याशिवाय, जे २३ मुस्लिम उमेदवार आहेत, त्यांनाही आमचा पाठिंबा आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंसाठी एक खुर्ची रिकामी ठेवलीय, कधीही डिबेटसाठी तयार!

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली

मुंबई शहरातील निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला प्रारंभ

ऑल इंडिया उलेमा बोर्डानेही काँग्रेसकडे १७ मागण्या करत त्या मागण्यांची पूर्तता केल्यास मतदान करण्याची भाषा केली होती. काँग्रेसनेही त्या मागण्या मान्य असल्याचे म्हटले होते. वक्फ बोर्डातील सुधारणेला या बोर्डाने विरोध दर्शविला होता. नोकऱ्या शिक्षणात मुस्लिमांना १० टक्के आरक्षण, २०१२ ते २०२४ या काळात विविध दंगलीमध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी, ४८ जिल्ह्यांत मशिदी, दर्गा व कब्रस्तानच्या जमिनींचे सर्वेक्षण करावे. महाराष्ट्रातील वक्फ मंडळाच्या विकासासाठी १ हजार कोटींचा निधी द्यावा. या मागण्या करत त्यांनी काँग्रेसला आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांच्या एकगठ्ठआ मतदानाचा फटका एनडीएला बसला होता. अनेक उमेदवार या एकगठ्ठा मतदानामुळे पराभूत झाले होते. तीच पद्धत आता विधानसभा निवडणुकीत वापरण्याचे कारस्थान रचले जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा