कॅनडामध्ये खलिस्तानी समर्थकांकडून वारंवार हिंदूंची मंदिरे लक्ष्य केली जात असताना ज्या ठिकाणी हिंदू मंदिरावर हल्ला झाला तिथे एक पोलिसच खलिस्तानी मोर्चात सामील झाल्याची बाब समोर आली होती. पुढे त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. हरिंदर सोही असे त्याचे नाव असून त्याच्याबद्दल नवी माहिती समोर आली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याला क्लीन चीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कॅनडाच्या पील प्रादेशिक पोलिसांनी सांगितले की, मंदिरावरील हल्ल्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे पोलीस अधिकारी हरिंदर सोही हे शस्त्रे समर्पण करण्यास नकार देणाऱ्या लोकांना निःशस्त्र करण्याचा प्रयत्न करत होते. ३ नोव्हेंबरपासून अनेक व्हिडिओंमध्ये, आक्रमक सोही खलिस्तानी झेंडा दाखवताना दिसत असून कोणत्याही आंदोलकाला निःशस्त्र करताना दिसत नाहीत. पील पोलिसांनी सांगितले की, तपासात असे आढळून आले आहे की अधिकाऱ्याने आपले कर्तव्य बजावण्याचे कायदेशीर काम केले आहे.
मंदिरावरील हल्ल्याची घटना ही दिवाळीच्या दिवसांमधील असून तेव्हाच काही खलिस्तान समर्थक आंदोलक ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात घुसले होते. जेथे भारतीय उच्चायुक्तालय सार्वजनिक शिबिर घेत होते. यावेळी पोलीस सोही याने खलिस्तानी ध्वज धरला होता. हे आश्चर्यकारक आहे की पील पोलिसांनी सांगितले की, सोही हा लोकांना निःशस्त्र करण्याचा प्रयत्न करत आहे कारण व्हिडिओमध्ये तो साध्या कपड्यात आणि ड्युटीमध्ये दिसत होता.
पोलिसांनी सांगितले की, मंदिराजवळील विरोध त्वरीत वाढला, सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आणि अधिकाऱ्यांनी शस्त्रे म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू जप्त केल्या. पोलीस आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये झालेल्या बाचाबाची दरम्यान, कॅनडाचा पोलीस अधिकारी हरिंदर सोही खलिस्तानी झेंडा हातात धरून कॅमेऱ्यात पकडला गेला, तर समर्थक, लाठ्या घेऊन, भारतविरोधी घोषणा देत होते.
हे ही वाचा :
शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!
“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”
काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!
शरद पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागली
सोही हा पील रिजनल पोलीस विभागात काम करतो. त्या मोर्चात खलिस्तान समर्थनार्थ घोषणाबाजी होत होती, तसेच भारतविरोधी घोषणाही दिल्या जात होत्या. त्यात खलिस्तानचा झेंडा घेऊन सोही सहभागी झाल्याचे दिसत होते. ब्रॅम्प्टन येथे हिंदू सभा मंदिरात जमलेल्या भक्तांवर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता तसेच हातातील झेंड्यांच्या काठ्यांनी त्यांना मारहाण केली होती. यानंतर आता सोही याला क्लीन चीट देण्यात आली आहे.