केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (१५ नोव्हेंबर) हिंगोली येथे सभा पार पडली. सभेपूर्वी गृहमंत्री अमित शाह हिंगोलीमध्ये दाखल होताच निवडणूक आयोगाकडून त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. याबाबत स्वतः गृहमंत्री शाह यांनी ट्वीटकरत माहिती दिली आणि ही निवडणूक आयोगाची नियमित प्रक्रिया असल्याचे म्हटले. दरम्यान, यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होती. यावरून ठाकरेंनी संताप व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.
गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटकरत म्हटले, आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवते आणि निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करते. आपण सर्वांनी निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे गृहमंत्री शाह म्हणाले.
हे ही वाचा :
मेट्रो- ३ च्या बीकेसी स्टेशनला आग; मेट्रोच्या फेऱ्यांना स्थगिती
श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब बिष्णोईच्या हिटलिस्टवर!
शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!
काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या यांच्या सभेदरम्यान हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर हा मुद्दा जास्त चर्चेत आला. कारण, उद्धव ठाकरेंनी याचा व्हिडीओ काढून पोस्ट केला आणि केवळ विरोधकांच्या हेलिकॉप्टरची तपासणी होती, सत्ताधारी नेत्यांची नाही, असा आरोप केला होता. उद्धव ठाकरेंच्या व्हिडीओनंतर सत्ताधारी नेत्यांचे देखील व्हिडीओ समोर आले, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरेंनी आपल्या व्हिडीओत गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणी व्हावी आणि त्याचा व्हिडीओ देखील पाठवा, अशी तंबी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, आज गृहमंत्री अमित शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली आणि त्यांनी स्वतः याचा व्हिडीओ ट्वीटकरत भाजपा सर्व नियमांचे पालन करते असे म्हटले.
आज महाराष्ट्र की हिंगोली विधानसभा में चुनाव प्रचार के दौरान चुनाव आयोग के अधिकारियों के द्वारा मेरे हेलिकॉप्टर की जाँच की गई।
भाजपा निष्पक्ष चुनाव और स्वस्थ चुनाव प्रणाली में विश्वास रखती है और माननीय चुनाव आयोग द्वारा बनाए गए सभी नियमों का पालन करती है।
एक स्वस्थ चुनाव… pic.twitter.com/70gjuH2ZfT
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2024