28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाबेकायदेशीररीत्या ३० हजार मोबाईल सिम विकणाऱ्या ८ जणांना अटक

बेकायदेशीररीत्या ३० हजार मोबाईल सिम विकणाऱ्या ८ जणांना अटक

शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Google News Follow

Related

कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न घेता केवळ ‘युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (यूपीसी कोड)’च्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करून सायबर फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना विकणाऱ्या दोन मोबाईल सिमकार्ड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यासह ८ जणांना मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने वर्षभरात ३० हजार मोबाईल सिम कार्ड बेकायदेशीर पद्धतीने विकल्याची धक्कादायक माहिती या टोळीच्या चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या बेकायदेशीर सिम कार्डाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी शेकडो जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.

महेश महादेव कदम, रा.ठी, दिवा, ठाणे ,रोहित कन्हैयालाल यादव, रा.ठी. भांडुप पश्चिम मुंबई, सागर पांडुरंग ठाकूर, रा.ठी. वडाळा पूर्व, मुंबई , राज रविनाथ आर्ड, रा.ठी. कल्याण पूर्व, ठाणे,गुलाबचंद कन्हैया जैस्वार, रा. ठी. कांदिवली, मुंबई,उस्मान अली मो हेजाबुर रहमान शेख, राठी. कुलाबा, मुंबई,अब्बुबकर सिद्दिकी युसुफ, राठी. कुलाबा, मुंबई आणि महेश चंद्रकांत पवार, राठी घाटकोपर, मुंबई असे अटक करण्यात आलेल्या आठ जणांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्यापैकी पाच जण मोबाईल कंपनीचे कर्मचारी असून उर्वरित तिघेजण दुकानदार आहे.

मुंबई सायबर पोलीस ठाण्यात जून महिन्यात एका व्यक्तीने सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली होती,शेअर्स ट्रेडिग फसवणुकीत त्यांची ५१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. तक्रारदार यांना सायबर गुन्हेगारांनी ‘MSFL Stock Chart 33’ या व्हॉटसअप ग्रुपमध्ये ऍड करून शेअर्स ट्रेडींग करण्यासाठी पैसे गुंतवणूक करण्याकरीता त्यांचे ब्रोकरेज कंपनीच्या Virtual पेजवर खाते तयार करून त्यात Virtual नफा जमा होत असल्याचे दाखवून त्यांना विविध बँक खात्यांमध्ये ५१,३६,००० हजार रुपये रक्कम भरण्यास भाग पाडले होते.

हे ही वाचा:

व्हीपीएम दहिसर शाळेच्या द्रिशीका बंगेराची महाराष्ट्र संघात निवड!

महाराष्ट्राची सेवा करण्याची पुन्हा संधी द्या!

मतदान अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या राजस्थानमधील उमेदवाराला अटक

डॉमिनिका देशाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च सन्मान!

सायबर पोलीस ठाण्याच्या तपासात व्हाट्सअप ग्रुप मधील मोबाईल क्रमांक तपासले असता या मोबाईलचे सिम घेण्यासाठी कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. केवळ यूपीसी कोडच्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करून त्यांची विक्री करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी हे मोबाईल सिम कुठून विकले गेले याची माहिती मिळवून तीन दुकानदारांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता दोन वेगवेगवेगळ्या मोबाईल कंपनीच्या कर्मचारी यांनी हे सिम बेकायदेशीररित्या पोर्ट करून दिल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, सायबर पोलिसांनी दोन्ही मोबाईल कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यासह दुकानदार असे आठ जणांना अटक केली आहे. मागील वर्षभरात या टोळीने ३० हजार मोबाईल सिम बेकायदेशीररित्या परदेशी नागरिक आणि फसवणूक करणाऱ्यांना विकल्याचे समोर आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा