बोरिवली गोराई येथे ज्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्या तरुणाच्या हातावरील टॅटू वरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आहे. रघुनंदन पासवान (२२) असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील राहणारा आहे. या तरुणाच्या हत्येमागे प्रेम प्रकरण असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटूंबियांनी केला आहे.या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाला अटक केली असून मृत तरुणाचे अटक आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती गोराई पोलिसांनी दिली आहे.
बोरिवली गोराई येथील झुडुपात १० नोव्हेंबर रोजी सात तुकड्यात एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. मृतदेहाच्या उजव्या हातावर इंग्रजी मध्ये RA असे गोदलेले (टॅटू) होते. या टॅटू वरून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
रघुनंदन पासवान असे मृत तरुणाचे नाव तो मूळचा बिहार राज्यातील असून पुण्यात नोकरीला होता. रघुनंदन पासवान याचा मोबाईल ३१ ऑक्टोबर पासून बंद असल्यामुळे त्याचे वडील त्याचा शोध घेत बिहार येथून पुण्याला आले होते. तेथून कळले की तो मुंबईला फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याचे वडील अंधेरी येथे एका नातेवाईकाकडे आले व त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा:
कोविडकाळात घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री
मतपेढीचे, जातीचे राजकारण करणा-यांना थारा देऊ नका
‘व्होट जिहाद’ साठी पैशांचा वापर
गोराई पोलिसाकडून मुंबईतील हरविलेल्या व्यक्तीचा माहिती काढत असताना अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग तक्रारीची माहिती घेऊन नातेवाईकांना बोलावून घेतले. दरम्यान, गोराई पोलिसांनी तक्रारदार यांना मृतदेहाच्या हातावरील टॅटू दाखवला असता त्यांनी तो ओळखला, पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरू केला असता वडिलांनी दिलेल्या माहितीवरून नालासोपरा येथे राहणाऱ्या एका मुस्लिम तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता रघुनंदन आणि ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाच्या बहिणीचे बिहारमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते.परंतु दोघांचा धर्म वेगळा असल्यामुळे दोघांच्या कुटूंबियांना त्याला मान्यता दिली नाही. त्यातून गावात वाद झाला. हा वाद मिटवून रघुनंदनच्या वडिलांनी रघुनंदन याला पुण्यात एका नातेवाईकडे नोकरीसाठी पाठवले होते.
काही महिन्यांनी मुलीच्या कुटूंबियांनी मुलीला नालासोपारा येथे भावाकडे पाठवले होते. मुलीकडे मोबाईल फोन नसल्यामुळे ती भावाच्या मोबाईल वरून रघुनंदन याला चोरून फोन करीत असे. अनेक महिने हा प्रकार सुरू होता. ३१ ऑक्टोबर रोजी रघुनंदन पुण्याहून काही मित्रांसोबत मुंबईत फिरण्यासाठी आला होता. ३१ ऑक्टोबर रोजी रघुनंदन याने दारूच्या नशेत आपल्या प्रेयसीला तिच्या भावाच्या मोबाईलवर फोन केला. नेमका फोन मुलीच्या भावाने उचलला आणि या दोघे एकमेकांच्या अद्याप ही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे लक्षात येताच मुलीचा भाऊ संतापला आणि त्याने गोड गोड बोलून रघुनंदनला १ नोव्हेंबर रोजी नालासोपारा येथे बोलून घेतले. त्या ठिकाणी त्याला दारू पाजून नशेत त्याची हत्या करून मृतदेहाचे सात तुकडे केले आणि हे तुकडे रंगाच्या रिकाम्या बकेट मध्ये भरून बकेट गोणीत भरून गोणी रिक्षाने गोराई येथे घेऊन आला.शेफाली दरिया किनारा येथील झुडपात फेकून दिला होता.
गोराई पोलिसांनी या हत्येप्रकरणी रघुनंदन याच्या प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. दरम्यान रघुनंदन याच्या वडिलांनी हे वेगवेगळ्या धर्मातील प्रेम असल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले.