अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. यानंतर जानेवारी महिन्यात ट्रम्प हे पदभार स्वीकारणार असून त्यांनी आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या नव्या टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एलॉन मस्क ते विवेक रामास्वामी अशा नव्या नावांना ट्रम्प यांच्या नव्या टीममध्ये संधी मिळाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे मित्र एलॉन मस्क यांना त्यांच्या नव्या टीममध्ये स्थान दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात हे स्पष्ट केले होते की, ते नवीन सरकारमध्ये एलॉन मस्क यांना काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. त्यानुसार, एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी हे डिपार्टमेंट ऑफ गव्हरमेंट एफिशियंसी (DOGE) प्रमुख असतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या दोन उत्कृष्ट व्यक्ती एकत्रितपणे माझ्या सरकारमधील नोकरशाही साफ करण्यापासून अनावश्यक खर्च कमी करणे, अनावश्यक नियम काढून टाकणे आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करणे या सर्व गोष्टींवर काम करतील.
याशिवाय फॉक्स न्यूज अँकर पीट हेग्था यांनाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. ट्रम्प पीट हेग्था यांना संरक्षण मंत्री बनवणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी ट्रम्प यांनी स्टीव्हन विटकॉफ यांची मध्यपूर्वेतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना इराक आणि अफगाणिस्तान युद्धांचाही अनुभव आहे. पीट हेगसेथ हे ट्रम्प यांचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांनी फ्लोरिडा सेनेटर मार्को रुबियो यांना परराष्ट्र सचिव म्हणून काम करण्यास सांगितले आहे आणि रुबियो हे भारत- अमेरिका संबंधांचे समर्थक असून भारताचे जुने मित्र आहेत. वर्षानुवर्षे ते भारत आणि भारतीय अमेरिकनांसाठी ‘काँग्रेसच्या कॉकस’चे सह- अध्यक्ष राहिले आहेत.
हे ही वाचा:
भाजपा-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे!
महाराष्ट्रात १९९५ नंतर हे प्रथमच घडते आहे…
बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?
“महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा महाराष्ट्राची लूट करू देऊ नका”
ट्रम्प यांनी त्यांची सहाय्यक एलिस स्टेफानिक यांना संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे राजदूत म्हणून पाठवण्याची ऑफर दिली आहे. स्टेफनिक यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या मित्राची भूमिका बजावली होती. ट्रम्प यांच्या टीममध्ये टॉम होमन यांचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी टॉम होमन यांना अमेरिकेच्या सीमा आणि बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपारीचे प्रभारी बनवले आहे. होमन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणीचे माजी कार्यकारी संचालक म्हणून काम केले होते. ट्रम्प यांच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचे ते सुरुवातीपासूनच समर्थक आहेत. निक्की हेली आणि पॉम्पीओ यांना ट्रम्प यांच्या नव्या टीममध्ये स्थान मिळालेले नाही.