छगन भुजबळ यांना संधी दिली पण त्यांचे उद्योग सुरूच होते. त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब झाली, अशा शब्दात शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर येवला येथे शरसंधान केले. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी पवारांवर जोरदार टीका करत जुना इतिहास उकरून काढला.
भुजबळ म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक, महापौर केलं. याबद्दल मी अनेकदा आभार मानले आहेत. पण शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म शरद पवार यांनी केले. तेव्हा शिवसेनेतील अनेकांना आपल्या बाजूला खेचण्याचे काम पवारांनी केले. मी तर ३६ लोकांच्या सह्या झाल्यानंतर शेवटी गेलो. शिवसेना फोडण्याचे काम पवारांनी केले”. “मी काय फोडू शकत नव्हतो. माझ्यात काहीतरी असेल म्हणून मला बाळासाहेबांनी महापौर केलं, म्हणूनच तुम्ही मला मंत्री केलं. पण आता बदनाम करण्यासाठी निवडणूकीत पवार बोलत आहेत.
भुजबळ यांनी सांगितले की, २००४ ला संधी होती तर मला मुख्यमंत्री केलं असतं. मला केलं नाही पण आर आर पाटील, अजित दादा यांना का नाही केलं? मुख्यमंत्री केल्यावर सहकारी वरचढ होतात म्हणून त्यांनी ना भुजबळ, ना आर आर पाटील, ना अजित दादाला मुख्यमंत्री केलं.
भुजबळांनी गौप्यस्फोट केला की, शरद पवार कधीपासून भविष्य पाहायला लागले? मला काहीही दोष नसतांना तेलगी प्रकरणात उगाच गोवण्यात आलं. मला राजीनामा द्यायला लावला. प्रफुल्ल पटेल यांनी ताबडतोब बोलावून घेतले. पटेल म्हणाले, राजीनामा द्यायला पाहिजे. मी राजीनामा द्यायच्या आधी त्यांनी राजीनामा देणार म्हणून जाहीर करून टाकलं.
हे ही वाचा:
भाजपा-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे!
महाराष्ट्रात १९९५ नंतर हे प्रथमच घडते आहे…
बॅगेची तपासणी केल्यावर मर्दांच्या पक्षप्रमुखाला घाबरण्याचे कारण काय?
“महाविकास आघाडीला दुसऱ्यांदा महाराष्ट्राची लूट करू देऊ नका”
भुजबळांनी पवारांना आवाहन केले की, आत्ताच या गोष्टी काढण्याची काय गरज होती? गडे मुर्दा उखडणे चांगलं नाही. उकरायला लागलो तर बात दूरतक जाएगी. जेलमधून आल्यावर सांगत होते जाऊ नका भेटायला, तरी मी शरद पवार भेटायला गेलो. अजित दादा रात्रंदिवस काम करतात म्हणून उपमुख्यमंत्री केलं ना? उमेदवार द्यायला किती चाळण्या लावतात. थेट काही मिळत नाही, पवार साहेबांना माझी विनंती, काही बोलू नका मला स्पष्टीकरण द्यावे लागते”.