24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेष‘कहो दिल से, अतुलजी फिरसे’

‘कहो दिल से, अतुलजी फिरसे’

काांदिवलीत अतुल भातखळकरांच्या प्रचाराने पकडला जोर

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघात निवडणूक रंजक आहे. इथे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयच्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार अतुल भातखळकर यांनी प्रचाराचा धडाकाच लावला आहे. इथल्या प्रत्येक मतदाराच्या तोंडावर ‘कहो दिल से, अतुलजी फिरसे’ ही एकच घोषणा पाहायला मिळते. भाजपाचे नेते आणि भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी आणि रवि किशन यांनी कांदिवलीत अतुल भातखळकरांसाठी जाहीर प्रचारसभा घेतल्यानंतर त्यांच्या विजयात रेकॉर्ड मार्जिनची भर निश्चित निश्चित झाली आहे. यामुळे कांदिवलीत उमेदवार अतुल भातखळकर यांच्या प्रचारयात्रांनी चांगलाच जोर धरला आहे.

रविवारी (१० नोव्हेंबर) सकाळी ९ आणि संध्याकाळी ५ वाजता प्रचारासाठी २ रथयात्रा काढण्यात आल्या होत्या. वार्ड क्र. ३६ मध्ये सकाळी ९ वा. जनता वेफर्स स्टेशन पासून प्रतापनगरपर्यंत रथयात्रा आयोजित करण्यात आली होती. लोकांनी या रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यासोबतच संध्याकाळी वार्ड क्र. २४ मधील सराफ चौधरी नगर पासून गोकुळ पॅराडाइज्डपर्यंत रथयात्रा पार पडली. लोकांनी अतुल भातखळकर यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती. फुलांची उधळण, रांगोळ्यां, आरत्या-ओवाळण्या आणि खूप काही.

दरम्यान, कांदिवली पूर्वचे लोकप्रिय उमेदवार अतुल भातखळकर यांनी जनतेशी संवाद साधला, ते म्हणाले, “ कांदिवली पूर्व विधानसभेत मी तुमच्या आशीर्वादामुळे १० वर्षांपासून आमदार आहे. दहा वर्षांत मी तुमच्या समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, याचे साक्षीदार तुम्ही स्वतः आहात. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे कि निवडणुकीनंतर यावेळीसुद्धा मी तुमच्या आशीर्वादानेच आमदार होईन आणि मागची १० वर्ष मी ज्याप्रमाणे तुमची सेवा केली तशीच यापुढेही करेन. माझी फक्त एकच मागणी आहे कि तुम्ही २० नोव्हेंबरला मतदानाला जा, पहिल्याच क्रमांकावर माझं नाव आहे, कमळाचं चिन्ह आहे, त्यासमोरचं बटन दाबा, शतप्रतिशत मतदान करा, आपलं बहुमूल्य मत वाया घालवू नका. तुम्ही रथयात्रेत आलात आणि रथयात्रा यशस्वी केली यासाठी मी तुमचा आभारी आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा : 

आता पुरुषांना ९ वर्षांच्या मुलीशीही लग्न करता येईल !

थकलेली, हुकलेली माणसं विधानसभेत पाठवून काय होणार, आग असलेली माणसं हवीत!

काँग्रेसकडून समाजात फूट, राष्ट्रीय शत्रूंविरोधात एकत्र येण्याची गरज!

तौकिर रझाने विष ओकले, आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचा आत्मा थरथर कापेल!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा