30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामाबाबा सिद्दीकी हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतमला पकडले; आणखी चार जणही ताब्यात

बाबा सिद्दीकी हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतमला पकडले; आणखी चार जणही ताब्यात

मुंबई क्राइम ब्रँचची कारवाई, नेपाळला जाण्याआधीच घातली झडप

Google News Follow

Related

अजित पवार गटाचे नेते तसेच चित्रपट अभिनेता सलमान खान याचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपीला पकडण्यात मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या (क्राइम ब्रँच) पोलिसांना यश आले आहे. शिवकुमार गौतम उर्फ शिवा याला पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात शिवकुमार होता. त्यासाठी तो उत्तर प्रदेशातील बाहराइच येथे लपला होता. मात्र तिथून पळून जाण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लॉरेन्स बिष्णोईच्या गँगचा तो सदस्य आहे. शिवकुमारसह अनुराग कश्यप (अटक केलेल्या धर्मराज कश्यपचा भाऊ), ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव, अखिलेंद्र प्रताप सिंह यांनाही पकडण्यात आले आहे.

शिवकुमार गौतम

बाबा सिद्दीकी यांची अज्ञात शूटर्सकडून १२ ऑक्टोबरला हत्या झाली होती. त्यासंदर्भात धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना अटक करण्यात आली होती. या अटक केलेल्या शूटर्सनी लॉरेन्स बिष्णोईच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याचे सांगितले होते. त्यात शिवकुमार गौतम हा मुख्य शूटर असल्याचेही समोर आले होते. त्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचने उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून सदर गुन्हेगार हे बहराईच येथे लपले असून नेपाळला पळण्याच्या तयारी असल्याची माहिती देण्यात आली. तेव्हाच त्याला पकडण्यात आले.

हे ही वाचा:

न्यूटन, गॅलिलिओपेक्षाही समकालिन शिवाजी महाराज, महाराणाप्रताप बुद्धिमान, तेजस्वी

अफजलखान वध म्हणजेच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साजरा होणार शिवप्रताप सप्ताह

मुंबई विभाग शालेय ऍथलेटिक्समध्ये ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेतील मुलांचे यश

लग्न पत्रिकेवर ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा, पंतप्रधान मोदींसह योगींचाही फोटो!

शिवकुमारने चौकशीत सांगितले की, धर्मराज कश्यप आणि तो एकाच गावात राहणारे आहेत. पुण्यात तो भंगारचा व्यवसाय करत असे. तिथे याच प्रकरणातील आणखी एक आरोपी शुभम लोणकरचेही दुकान होते. लोणकर हा बिष्णोईसाठी काम करत असे. त्याने लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईशी शिवकुमारचा संपर्क करून दिला. तेव्हा त्याला बाबा सिद्दीकीच्या हत्येची सुपारी देण्यात आली. त्यासाठी १० लाख रुपये देण्यात येतील असेही सांगितले. शुभम लोणकर आणि मोहम्मद यासिन अख्तर यांनी यासाठी पिस्तुल, काडतुसे, सिम कार्ड व मोबाईल उपलब्ध करून दिले.

ही हत्या झाल्यानंतर तिथे दोघांना पकडण्यात आले तर शिवकुमार हा पळून जाण्यात यशस्वी झाला. तो पुण्याला निघून गेला. तिथून तो बहराइचला निघाला. तिथे त्याला सांगण्यात आले की, त्याची नेपाळमध्ये लपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण त्याआधीच त्याला अटक करण्यात आली. त्याला पळून जाण्यास मदत करणारे आणखी चौघेही ताब्यात आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा