29 C
Mumbai
Tuesday, December 3, 2024
घरविशेषसुन लो ओवैसी...संभाजीनगरचे नाव औरंगाबाद करणारा अजून जन्माला यायचा आहे!

सुन लो ओवैसी…संभाजीनगरचे नाव औरंगाबाद करणारा अजून जन्माला यायचा आहे!

भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावले

Google News Follow

Related

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरु असून आरोप-टीका-टिप्पणी होत आहे. याच दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका प्रचार सभेत एमआयएमवर हल्ला चढवत ठणकावले आहे. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर ठेवण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, अजूनही काही लोक असे आहेत, जे छत्रपती संभाजी नगर ऐवजी औरंग्याच्या नावाने तुनतुने वाजवून औरंगाबाद असल्याचे सांगत आहेत. अशामध्ये एमआयएमचे नेते पुढे असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहेत. अशाच एका एमआयएमच्या सभेत एका महिलेने नामकरणाचा उल्लेख केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ओवैसीना लक्ष्य करत त्यांची कानउघाडणी केली आणि औरंगाबाद नाहीतर छत्रपती संभाजी नगरच म्हणून ओळखले जाणार असल्याचे म्हटले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओवैसी हे छत्रपती संभाजी नगर. सुन लो ओवैसी छत्रपती संभाजीनगर…. किसी का बापभी पैदा हुआ तो ये नाम नही बदल सकता. ते पुढे म्हणाले, काल एमआयएमची सभा झाली, सभेमधील एक महिला म्हणते, कोण संभाजी महाराज आहेत, हे कसे संभाजी नगर झाले. त्यांना मी सांगू इच्छितो, ‘देश-धर्मपर मिटणे वाला शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था’.

हे ही वाचा : 

लाडक्या बहिणींना प्रतिवर्षी २५ हजार २०० रु., कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ; भाजपचा संकल्प

कॅनडातील हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक!

भिवंडीत ठाकरेंना धक्का, माजी आमदार रुपेश म्हात्रे शिंदे गटात सामील!

श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू

छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेब याठिकाणी आला होता. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्ष औरंगजेबाला झुंझवत ठेवले, एकही लढाई हारली नाही. जर फितुरी झाली नसती तर औरंगजेबाच्या तावडीत छत्रपती संभाजी महाराज सापडले नसते. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक अत्याचार केले. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्म सोडण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ज्या औरंगजेबाचे थडगे याठिकाणी तयार झाले त्याचे नाव या शहराला राहू शकत नाही. म्हणून महायुती सरकारने छत्रपती संभाजी महराजांचे नाव या शहराला दिले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
205,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा