मुंबईसह राज्यात बेकायदा स्थलांतरितांचा मुद्दा सतावत असताना या बेकायदा स्थलांतरितांची समस्या ठळक करणारा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या (TISS) अभ्यास अहवालात मोठे खुलासे करण्यात आले आहेत. मुंबईतील हिंदू लोकसंख्या २०५१ सालापर्यंत ५४ टक्के कमी होईल. शिवाय बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढेल, असे अहवालातून चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोह्स्ल मीडियावर पोस्ट केली आहे.
अहवालानुसार, १९६१ पासून आतापर्यंत हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्क्यांवरून २०११ मध्ये ६६ टक्के झाली आहे. तर, मुस्लिम लोकसंख्या १९६१ मधील आठ टक्क्यांवरून २०११ मध्ये २१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. याशिवाय असा अंदाज आहे की, २०५१ पर्यंत हिंदू लोकसंख्या ५४ टक्के कमी होईल आणि मुस्लिम लोकसंख्या सुमारे ३० टक्के वाढेल.
TISS च्या अंतरिम अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की, मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांच्या वाढत्या संख्येचा शहराच्या सामाजिक- अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. २०५१ पर्यंत हिंदू लोकसंख्या ५४ टक्क्यांपर्यंत कमी होईल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. काही राजकीय संघटना या अवैध स्थलांतरितांचा वापर व्होट बँकेच्या राजकारणासाठी करत असल्याचेही बोलले जात आहे. कागदपत्र नसलेले बेकायदेशीर स्थलांतरित कसे बनावट मतदार ओळखपत्र मिळवत आहेत हे देखील या अहवालात उघड झाले आहे.
मुंबई में 2051 तक 54% कम हो जाएगी हिंदू आबादी, बांग्लादेशियों और रोहिंग्याओं की बढ़ रही तादातः
टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस TISS की रिपोर्ट@BJP4Maharashtra pic.twitter.com/uh3X08BFuK
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 9, 2024
भारतातील अग्रगण्य सामाजिक विज्ञान संस्था आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत अनुदान असलेल्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या या अंतरिम अभ्यास अहवालात अनेक धक्कादायक खुलासे आणि निष्कर्ष समोर आले आहेत. TISS चा हा अहवाल सांगतो की, मुंबईत बांगलादेश आणि म्यानमारमधील बेकायदेशीर स्थलांतरितांची (बहुतेक मुस्लीम) संख्या वाढत आहे. काही राजकीय पक्ष त्यांचा वापर व्होट बँकेच्या राजकारणासाठी करत आहेत.
हे ही वाचा:
ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!
काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय
पूर्व उपनगरातील ५३ सराईत गुन्हेगारांना करण्यात आले तडीपार
तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड
दुसरीकडे, मराठी मुस्लिम सेवा संघ, १८० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मुस्लिम समुदायामध्ये मतदार नोंदणीला चालना देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. या गटाने राज्यभरातील मुस्लिम मतदारांसाठी बैठका आणि माहिती सत्रांचे आयोजन केले आहे. या माध्यमातून त्यांना ‘मत जागृती’ पसरवण्याच्या नावाखाली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे, अशी बाबही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणली आहे.