34 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरराजकारणमी कोणतीही मुलाखत दिलेली नाही! भुजबळांनी राजदीपच्या पुस्तकातील दावे फेटाळले

मी कोणतीही मुलाखत दिलेली नाही! भुजबळांनी राजदीपच्या पुस्तकातील दावे फेटाळले

कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा

Google News Follow

Related

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४: द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकात छगन भुजबळ यांच्याविषयी काही मजकूर छापला असून यावरून आता खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात याच्या चर्चा रंगल्या असून या पुस्तकात म्हटले आहे की, एका मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपासोबत गेल्याचे लिहिण्यात आले आहे. मात्र, यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत पुस्तकात लिहिलेला दावा फेटाळून लावला आहे. शिवाय यावर कायदेशीर कारवाई करण्याचे म्हटले आहे.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पुस्तकातील उल्लेखाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. “मी अशी कोणतीच मुलाखत दिलेली नाही. तसेच ईडीपासून सुटका करण्यापासून आम्ही सर्व भाजपसोबत गेले, असा आरोप गेल्या अनेक दिवासांपासून आमच्यावर होतो आहे. मला महाराष्ट्र सदन प्रकरणातून देखील न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे. ही क्लिनचीट उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दिली होती. त्यावेळी मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पेढेही दिले होते,” असं छगन भुजबळ म्हणाले.

“मला तुरुंगात जाण्याची भीती आहे, असा आरोप केला जात आहे, तो मी नाकारत आहे. आम्ही विकासासाठी एकत्र आलो. आमच्याबरोबर ५४ लोक आहेत. त्यांच्यावर प्रत्येकावर ईडीची केस नव्हती. माझ्या मतदार संघात दोन हजार कोटींची कामे सुरु आहेत. सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो, त्याचा विकासासाठी फायदा झाला आहे,” अश स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिले आहे.

पुढे भुजबळ असेही म्हणाले की, हे पुस्तक आताचं का छापलं गेलं, हे मला कळलेलं नाही. मी अजून पुस्तक वाचलेलं नाही. त्यामुळे पुस्तकात काय लिहिलंय- काय नाही, हे बघेन आणि माझ्या वकिलांसोबत बोलेन. सध्या निवडणुकीमुळे खूप व्यस्त असून निवडणुकीनंतर माझ्या वकिलांशी बोलून यावर निर्णय घेईन, असं छगन भुजबळ म्हणाले.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरमधील सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीर अधिवेशन: पाचव्या दिवशीही कलम ३७० च्या मुद्द्यावरून गदारोळ

जम्मू- काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दोन ग्रामरक्षकांची हत्या

राहुल गांधी यांनी अफू घेऊन लिखाण केलेय का?

या पुस्तकाचे लेखक राजदीप सरदेसाई यांनी म्हटले आहे की, “लोकांनी हे पुस्तक वाचावं. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात काय घटनाक्रम घडले, त्याचं स्पष्टीकरण आहे. जनतेने पुस्तक वाचायला पाहिजे. राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार लेखक म्हणून जी वस्तूस्थिती आहे, ती लिहली. छगन भुजबळ माझ्यासोबत बोलत असताना अनेक लोक त्यावेळी सोबत होते. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. हे राजकारणाचे प्रश्न आहे. राजकारण ज्यांना करायचा त्यांना करू द्या मी त्यात पडणार नाही,” असं राजदीप सरदेसाई यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा