रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा विजय नोंदवला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा यामध्ये पराभव झाला. डोनाल्ड ट्रम्प हे विजयी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या शानदार विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांच्यासोबत काम करण्याचे आश्वासन दिले. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता आणि सहकार्यासाठी एकत्र काम करण्याबाबत चर्चा केली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय होताच पंतप्रधान मोदींनी सोशल मिडीयावर ट्वीटकरत म्हटले, ‘माझे मित्र’ ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना ट्रम्प यांनी त्यांचे वर्णन ‘अद्भुत व्यक्ती’ असे केले आणि संपूर्ण जगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम असल्याचे सांगितले. ट्रम्प पंतप्रधान मोदींना आपला खरा मित्र मानतात. भारत हा एक अद्भुत देश आहे, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या मते, मोदी हे पहिल्या जागतिक नेत्यांपैकी एक होते ज्यांच्याशी त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर फोनवर बोलले. यावरून ट्रम्प यांना भारताबद्दल किती आदर आहे हे दिसून येते. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना “टोटल किलर” म्हटले होते.
विशेष म्हणजे, ट्रम्प यांनी त्यांच्या विजयानंतर पहिले कॉल पंतप्रधान मोदी, इस्रायलचे नेतन्याहू आणि सौदी अरेबियाचे मोहम्मद बिन सलमान यांना केले होते. दरम्यान, भारत- अमेरिकेतील संबंध सातत्याने दृढ होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील संभाषणावरून दोन्ही देशांमधील आर्थिक, राजकीय आणि धोरणात्मक सहकार्य आगामी काळात अधिक दृढ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
हे ही वाचा :
जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड एआय वकिलांशी संवाद साधतात…
अमेरिकेत चाय-बिस्कुटांसह सोरोस तंत्राचाही पराभव…
हिंदू समाज एकत्र येऊ नये म्हणून काम करणारा संत म्हणजे शरद पवार!