अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने ऍमेझोन आणि फ्लिपकार्ट यांच्यासारख्या प्रसिद्ध ई- कॉमर्स कंपन्यांशी संबंधित काही विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. देशभरात २१ हून अधिक ठिकाणी या कंपन्या आणि त्यांच्या उपकंपन्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली जात आहे. दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. विदेशी चलन नियमन कायद्यांतर्गत (FEMA) ही कारवाई करण्यात आली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने ऍमेझोन आणि फ्लिपकार्ट विरुद्ध FEMA उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन कंपन्यांवर त्यांच्या इतर अनेक सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री केल्याचा आरोप आहे, ज्या अंतर्गत सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे FEMA उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ऍमेझोन आणि फ्लिपकार्टशी संबंधित त्यांच्या संलग्न कंपन्यांची नावे एपिरिओ रिटेल, श्रीयस रिटेल, दर्शिता रिटेल आणि आशियाना रिटेल असल्याचे सांगितले जाते आहे. या कंपन्यांनी स्थानिक स्पर्धा नियमांचे उल्लंघन केले असून विक्रेत्यांना प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी चुकीची परवानगी दिली आहे. या विक्रेत्यांनी भरघोस सूट देऊन अनेक नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे इतर कंपन्यांचे नुकसान झाले.
हे ही वाचा :
आधी आपल्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न तर लावा!
विधानसभा निवडणुकीसाठी मदत करण्याचे उलेमांचे उबाठा नेत्यांना आश्वासन
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही
५० लाख रुपये दे नाहीतर… शाहरुख खानला धमकी!
दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. ऍमेझोन आणि फ्लिपकार्टचा गैरवापर केल्याचा आरोप असलेल्या या विक्रेत्यांनी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले आहेत का, या दृष्टिकोनातून ईडी तपास करत आहे. यातील बहुतांश विक्रेत्यांवर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी ऍमेझोन आणि फ्लिपकार्टने यावर कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.