राज्यमंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर त्यांच्या निकटवर्तीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात बाबा सिद्दीकीच्या एका निकटवर्तीय असणाऱ्या व्यक्तीने नुकतीच तक्रार दाखल केली आहे. या निकटवर्तीयाला एका अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने ५ कोटी रुपयांची मागणी केली असून खंडणी न दिल्यास बाबा सिद्दीकी सारखी अवस्था करण्यात येईल अशी धमकी देण्यात आल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली. ३१ ऑक्टोबर रोजी ही धमकी आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारदार हे बाबा सिद्दीकी यांचे निकटवर्तीय असून सिद्दीकी यांची हत्या झाली त्या वेळी ते त्यांच्या सोबत होते, व घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा:
…आणि उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले!
सदनिकेची विक्री केली, पण खरेदीदाराला मूळ कागदपत्रे न देताच घेतले गृहकर्ज
अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनी फडकवला विजयाचा झेंडा
पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?
तक्रारदार यांनी खार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमाकावरून कॉल आला होता, कॉल करणाऱ्याने कॉल वरून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली असून ती दिली नाही तर बाबा सिद्दीकी सारखीच तुमची अवस्था करू असे धमकी देण्यात आली असल्याचे तक्रारदार यांनी म्हटले आहे. तक्रारदार हे खार येथे राहणारे असून त्यांनी याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल केला असून तक्रारदार यांना आलेल्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आरोपीची माहिती काढण्यात येत आहे, लवकरच आरोपीला अटक करू अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी दिली.