जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांवर बुलडोझरची कारवाई करण्यात येणार आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांची घरे जमीनदोस्त केली जातील, असा इशारा जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दिला आहे. या कारवाईबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एलजी मनोज सिन्हा यांनी राज्यातील जनतेला दहशतवादाच्या सूत्रधारांच्या विरोधात जाण्याचे आवाहन केले आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मंगळवारी (५ नोव्हेंबर ) श्रीनगरमध्ये राबता-ए-आवाम नावाच्या सार्वजनिक कार्यक्रमात हे वक्तव्य केले. दहशतवाद ओळखणे केवळ प्रशासन किंवा सुरक्षा दलांचे काम नाही तर लोकांचेही हे काम आहे आणि तिघांनी मिळून ठरवले तर दहशतवाद संपायला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.
आपल्या देशात असे लोक आहेत जे दहशतवादाचे समर्थन करतात आणि नंतर म्हणतात की आमच्यावर अन्याय झाला. हे योग्य नाही. ४०,०००-५०,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. किती स्त्रिया विधवा झाल्या, किती बहिणींचे भाऊ गेले, जनता जर या लोकांसाठी उभी राहिली नाही तर हे काश्मीर कधीच बदलणार नाही, असे एलजी मनोज सिन्हा म्हणाले.
हे ही वाचा :
‘पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद निर्माण करण्यासाठी फिरतंय’
महाविकास आघाडी नव्हे ही महाअनाडी आघाडी, त्यांना देश, धर्माची चिंता नाही!
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
ब्रिजेश सिंह यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याचे उदाहरणच घालून दिले आहे!
लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी दहशतवादाच्या सूत्रधारांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘मी सुरक्षा दलांना कोणत्याही निरपराधांना इजा न करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु दोषींना सोडले जाणार नाही. जर कोणी दहशतवाद्यांना आश्रय दिला तर त्याचे घर जमीनदोस्त केले जाईल. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या विरोधात हे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी निवासी भागात सातत्याने अनेक दहशतवाद्यांना ठार मारले आहे. अलीकडेच लष्कराने श्रीनगरमध्ये एका घरात लपलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. लष्कराने हे घरही जमीनदोस्त केले होते.