राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रचारादरम्यान निवडणुकीत उभे राहिलेले उमेदवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप-टीका-टिप्पणी करत आहेत. अशीच टिप्पणी करणाऱ्या एमआयएमच्या उमेदवाराला भाजपा नेते नारायण राणे यांनी थेट इशाराच दिला आहे.
एमआयएमने छत्रपती संभाजीनगरमध्ये नासिर सिद्दिकीला उमेदवारी दिली आहे. नासिर सिद्दिकी यांच्या प्रचारासाठी अकबरुद्दी ओवैसी यांनी प्रचारसभा घेतली होती. या प्रचारसभेत नासिर सिद्दिकी यांनी नाव न घेता भाजपा आमदार नितेश राणेंवर टिप्पणी करत वादग्रस्त वक्तव्य केले. एक पाच फूट, ५ रुपयावाला पेप्सी मशिदीत घुसून मारू, अशी भाषा करतो, एवढी हिंमत वाढलीय. पण मी तुम्हाला सांगतो विधानसभेत घुसून मारण्याची ताकद ठेवतो, असे वादग्रस्त वक्तव्य नासिर सिद्दिकी यांनी केले.
नासिर सिद्दिकी यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते नारायण राणे यांनी पलटवार करत थेट इशाराच दिला. ‘हिंदू विरोधात गरळ ओकणा-यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील’, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा आणण्याची खुमखुमी, विधानसभेत प्रस्ताव मंजूर!
‘मुस्लिमांना कुंभमध्ये बंदी घातली तर हिंदूंना दर्ग्यात प्रवेश दिला जाणार नाही’
संविधान बचाव, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधींकडून अराजकता पसरवण्याचे काम सुरू
भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा
नारायण राणे यांनी ट्वीटकरत म्हणाले, एम्आयएम् चे औरंगाबाद मध्यचे उमेदवार नासीर सिद्दीकी यांनी आमदार नितेश राणे यांना विधानसभेत घुसून मारण्याची धमकी जाहीर भाषणातून दिली. हा तोच पक्ष आहे, ज्याच्या प्रमुखांनी एक एक मुसलमान वीस हिंदूंना भारी पडेल अशी दर्पोक्ती केली होती. निजामशाहीच्या या पाठिराख्यांनी लक्षात ठेवावे देशात आता लांगुलचालन करणा-यांचे सरकार नसून बहुसंख्यांचे हितरक्षण करणारे सरकार आहे. नितेश राणे व हिंदू विरोधात गरळ ओकणा-यांचे पाय विधान भवनाकडे वळण्याआधीच कलम केले जातील, असा इशारा नारायण राणे यांनी नासिर सिद्दिकी यांना दिला आहे.
निजामशाहीच्या पाठीराख्यांना इशारा pic.twitter.com/1fWNOluzIz
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 6, 2024