उत्तर प्रदेशातील संभल येथील समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, आगामी महाकुंभमेळ्यात जर मुस्लिमांवर बंदी घातली तर ते लोक सुद्धा हिंदूंना दर्ग्यांमध्ये प्रवेश देणार नाहीत. जर बंदी घातली गेली तर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश न देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे बर्क म्हणाले.
महाकुंभदरम्यान मुस्लिमांना दुकाने देऊ नयेत, या आखाडा परिषदेच्या मागणीनंतर बर्क यांचे वक्तव्य आले आहे. आखाडा परिषदेसोबतच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री ‘बागेश्वर बाबा’ यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
हे ही वाचा :
संविधान बचाव, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधींकडून अराजकता पसरवण्याचे काम सुरू
भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा
जम्मू- काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!
दरम्यान, काही विद्वानांनी म्हटले आहे की, ज्याप्रमाणे सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान मक्का आणि मदिनामध्ये हिंदूंसह गैर-मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांनी हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या पवित्र घटनेचा आदर केला पाहिजे आणि अंतर राखणे आवश्यक आहे.