अराजकता पसरवण्याचे काम राहुल गांधींच्या माध्यमातून होत आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधून माध्यमांशी बोलताना केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी राज्यात येत आहेत. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, आज राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा आणि संविधान बचाव मुद्द्यावरून तोफ डागली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “भारत जोडो हा एक समूह तयार करण्यात आला आहे. या समुहात अशा अनेक संघटना आहेत ज्या अतिशय डाव्या विचारसरणीच्या आहेत. ज्यांची ध्येय धोरणे, कामाची पद्धत पाहिली तर अराजक पसरवणारी ही यंत्रणा आहे,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
‘गादी’वान झाले ताटाखालचं मांजर; मग अपमान होणारच ना ?
सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही
दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे
“राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात?” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्या लोकांना एकत्र करून समाजामध्ये विद्वेष आणि अराजकता निर्माण करण्याचे काम होत आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही. अर्बन नक्षलवादचा अर्थ लोकांची माने प्रदूषित करायची, कलुषित करायची, अराजकतेचे रोपण करायचे जेणेकरून त्यांचा देशातील संस्था, यंत्रणांवरील विश्वास उडेल आणि देशाच्या एकतेला धोका होईल. आज हेच काम राहुल गांधींच्या माध्यमातून होतंय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर केली.