भारतातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून जगातील अनेक देशांनी विविध मार्गांनी भारताला मदतीचा हात दिलेला आहे. बहुतांशी देशांकडून ऑक्सिजनच्या वहनासाठी लागणारे क्रायोजेनिक टँकर्स आणले गेले आहेत. आता भारताच्या मदतीला थेट संयुक्त राष्ट्रे उतरली आहेत त्यांनी भारताला मोठ्या प्रमाणात मदत पुरवण्यात आल्याचे सांगितले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी युनिसेफच्या माध्यमातून भारताला विविध आवश्यक सुविधा पुरवल्या असून असून यात तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांचे उपप्रवक्ता फरहान हक यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
हे ही वाचा:
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधेही आता भारत आत्मनिर्भर
अदर पुनावालांना धमकावणारे शिवसेनेचे गुंड?
महाराष्ट्रात आगींचे सत्र सुरूच
ऑक्सिजनच्या परिवहनासाठी महिंद्रांकडून प्रयत्न
भारताला देण्यात आलेल्या मदतीत आरोग्य चाचण्यांसाठी आवश्यक उपकरणे, ८५ आरटी-पीसीआर यंत्रे, अन्य आवश्यक वैद्यकीय वस्तू व तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात धाडले आहेत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय महाराष्ट्र व ईशान्य भारतात ऑक्सिजननिर्मितीचे २५ प्रकल्प सुरू करण्यासाठी युनिसेफ सहकार्य करत आहे. तसेच, भारताच्या प्रत्येक बंदरावर थर्मल स्कॅनरची उभारणी केली जात आहे, अशी माहिती हक यांनी दिली.
भारतातील करोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत, असे ट्वीट संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरस यांनी केले होते. या ट्वीटचा उल्लेख करत हक यांनी ही माहिती दिली होती.
With the entire @UN family, I stand in solidarity with the people of India as they face a horrific #COVID19 outbreak.
The UN stands ready to step up our support.
— António Guterres (@antonioguterres) April 29, 2021
वॉलमार्टकडून मदत
भारताला वॉलमार्टकडूनही सहाय्य मिळणार आहे. याशिवाय करोनावरील उपाययोजनांसाठी वॉलमार्ट खासगी संस्थांना २० लाख अमेरिकी डॉलरचे अर्थसाह्यही करणार आहे. त्याबरोबरच वॉलमार्ट फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती करणारे २० प्रकल्प तसेच, २० क्रायोजेनिक कंटेनर वॉलमार्टकडून भारताला मिळणार आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन वॉलमार्टकडून पहिल्या टप्प्यात तीन हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स भारतात पाठवले जाणार असून भविष्यासाठी २५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची तरतूद करण्यात येणार आहेत
अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून आघाडीची आंतरराष्ट्रीय पेमेंट कंपनी मास्टरकार्डने भारताला दोन हजार फिरत्या खाटा देऊ केल्या आहेत. यासाठी मास्टरकार्डने या फाउंडेशनला ८९ लाख अमेरिकी डॉलरचे अर्थसाह्य केले आहे. या खाटा व्हेंटिलेटरसह सर्व आवश्यक सुविधांनी युक्त असतील, असे मास्टरकार्डने म्हटले आहे.
बोइंगकडून एक कोटी डॉलर
बोइंग या विमान बांधणी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने भारताला १ कोटी अमेरिकी डॉलरचे तातडीचे अर्थसाह्य घोषित केले आहे. कोविडकाळात भारतात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांना हे साह्य केले जाणार आहे. कोरोना महामारीने जगभरातील सर्व देशांना उद्ध्वस्त केले आहे. भारतीय नागरिकही सध्या बिकट स्थितीतून जात आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती वाटत असून त्या दृष्टीने ही मदत करण्यात येईल, असे या कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.