27 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषअदानींनी बांगलादेशला दाखवली 'पॉवर'

अदानींनी बांगलादेशला दाखवली ‘पॉवर’

७ नोव्हेंबर पर्यंत थकबाकी भरा, नाहीतर वीज पुरवठा बंद

Google News Follow

Related

बांगलादेशमध्ये विजेचे संकट आणखी गडद होऊ शकते. कारण अदानी समूहाने बांगलादेशला ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरण्यास सांगितले आहे. जर तसे नाही केले तर संपूर्ण वीज पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा अदानी समूहाने दिला आहे. दरम्यान, अदानी समूहाने वीज खंडित केल्यास बांगलादेशात विजेचे संकट निर्माण होऊ शकते. थकबाकीमुळे यापूर्वी अदानी पॉवरने बांगलादेशला होणारा निम्मा वीज पुरवठा बंद केला आहे.

बांगलादेश अदानी पॉवरचे $८५० दशलक्ष (सुमारे ७२०० कोटी रुपये) देणे आहे. या रकमेची मागणी करण्यासाठी अदानी पॉवरने बांगलादेशच्या अंतरिम सरकारशी अनेकवेळा चर्चा केली पण त्यावर तोडगा निघाला नाही. अशा परिस्थितीत अदानी समूहाने संपूर्ण वीज पुरवठा बंद करणार असल्याची भाषा केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अदानी समूहाने बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डला (बीपीडीबी) थकबाकी भरण्यासाठी आणि पेमेंटची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी $ १७० दशलक्ष किमतीचे  (सुमारे १५०० कोटी) लेटर ऑफ क्रेडिट (LC) प्रदान करण्यास सांगितले होते. ती देण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

नसीम सोलंकी पूजेनंतर गंगेच्या पाण्याने मंदिर पवित्र केले

जम्मू-काश्मीर: श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेडचा स्फोट, १० जण जखमी!

जरांगे म्हणतात, कुणाची तरी जिरवायची आहे!

हत्तींच्या हल्य्यात दोघांचा मृत्यू

बीपीडीबीने कृषी बँकेमार्फत थकबाकीच्या रकमेवर एलसी जारी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हे पाऊल वीज खरेदी कराराच्या अटीनुसार न्हवते. डॉलरच्या तुटवड्यामुळे बांगलादेश पेमेंट करू शकत नाही, अशी एकाने माहिती  टाईम्स ऑफ इंडियाला दिली.

दरम्यान, एलसी न मिळाल्यामुळे अदानी पॉवर झारखंड लिमिटेडने बांगलादेशचा वीजपुरवठा अर्धा केला आहे. अदानी पॉवर झारखंड बांगलादेशला सर्वात मोठा वीज पुरवठादार आहे. त्यापाठोपाठ पायरा (१,२४४ मेगावॅट), रामपाल (१,२३४ मेगावॅट) आणि एसएस पॉवर (I ) (१,२२४ मेगावॅट) प्लांट्स आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा