महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दादरच्या शिवाजी पार्क परिसरात दरवर्षी प्रमाणे दिपोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये भव्य रोषणाई करण्यात आली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने या दिपोत्सवावर आक्षेप घेतला आहे. तसेच मनसेच्या दिपोत्सवाविरोधात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
दरवर्षी दिवाळीला मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले जाते. हजारोंच्या संख्येने नागरिक ही रोषणाई पाहण्यासाठी येत असतात. मात्र, हा दीपोत्सव म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हणत ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. मनसेच्या दिपोत्सवाविरोधात दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्याकडे ठाकरे गटाने तक्रार दखल केली आहे. दिपोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडून नियमबाह्य परवानगी घेण्यात आल्याचा आरोप ठकारे गटाने मनसेवर केला आहे. मनसेकडून अचारसंहितेच उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार अनिल देसाई यांनी केली आहे. मनसेने मात्र ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली आहे.
हे ही वाचा :
छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
“भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाचीही तडजोड करू शकत नाही”
मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी
सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणारे आणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध आहे. हिरवे कंदिल लागले असते, तर विरोध केला असता का?” असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे. उबाठाचा हिंदू सणांना विरोध आहे. उद्या हे ईदचे लायटिंग असते, हिरवे कंदिल लागले असते तर उबाठाने विरोध केला असता का? हा माझा सिंपल प्रश्न आहे. भेडींबाजारमध्ये जाऊन ईदच्या कंदिलाला विरोध केला असता का? ईदमध्ये डीजे लावतात त्यांना विरोध करता का? मग हिंदू सणांना विरोध का? उबाठाची भूमिका हिंदू सण विरोधी आहे” अशी जोरदार टीका संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर केली आहे.