32 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरक्राईमनामाछत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू

Google News Follow

Related

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील सर्वचं जिल्ह्यात भरारी पथके आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जागोजागी वाहनांची तपासणी केली जात असून गैरमार्गाने नेला जात असलेला पैसा आणि इतर मुद्देमाल जप्त केला जात आहे. राज्यभरात विविध ठिकाणी कारवाई केली जात असताना छत्रपती संभाजी नगरमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात १ कोटी ७९ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये भेटवस्तूंसह मद्याचाही समावेश असल्याचे संबंधित कक्षाकडून सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी निवडणूक विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथके, व्हिडिओ चित्रीकरण करणारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून वाहनांची, प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

कोणाकडेही ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आढळल्यास त्याबाबत विचारपूस करण्यात येत आहे. शिवाय याबाबतचे योग्य पुरावे सादर न केल्यास संबंधित रोकड तसेच सोने- चांदीसारखा मुद्देमाल जप्त केला जात आहे. खासगी, सार्वजनिक वाहनांमधून होणाऱ्या वाहतुकीवर आणि त्यातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवा, असे निर्देश या पथकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या पथकांच्या माध्यमातून वाहनांची, प्रवाशांची तपासणी केली जात आहे.

हे ही वाचा : 

“भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाचीही तडजोड करू शकत नाही”

मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी

सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण

आमदार जयश्री जाधवांचा काँग्रेसला रामराम; शिवधनुष्य घेतले हाती

गेल्या आठवड्यात सिडको बसस्थानक परिसरात एका तरुणाची बॅग तपासणी केली असता त्यात साडेसात लाख रुपये रोख रक्कम, चार ग्रॅम सोने सापडले होते. त्यानंतर पंचनामा करून ही रक्कम जप्त केली होती. मध्य मतदारसंघात २ लाख तसेच गंगापूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ५० हजारांची रोकड सापडली आहे. यासह सर्व मतदारसंघात मिळून २७ लाख १७ हजार रुपये किमतीचा दारूचा साठा, गंगापुरात ७९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ, ६० लाख रुपये किमतीच्या इतर वस्तू असे रोख रकमेसह एकूण १ कोटी ७९ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याची माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा