जगभरातील बहुचर्चित अशी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल २०२५ साठीची रिटेन्शन लिस्ट जाहीर झाली आहे. यामुळे या स्पर्धेतील १० संघांनी कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात कायमं ठेवले आहे याचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिटेन्शनमध्ये सर्व संघांना एकूण सहा खेळाडूंना सोबत ठेवण्याचा पर्याय होता. याशिवाय ज्या संघांनी सहा पेक्षा कमी खेळाडू कायम ठेवले आहेत ते आता मेगा लिलावात RTM द्वारे काही खेळाडू संघात सामील करून घेऊ शकतात. रिटेन्शन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर होती.
मुंबई इंडियन्सने एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्या नावांचा या रिटेनशनमध्ये समावेश आहे. तर चेन्नई सुपर किंग्जनेही एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. या संघात महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि मथिसा पाथिराना यांना स्थान देण्यात आले आहे. यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघानेही एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले असून हेन्री क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांना संधी देण्यात आली आहे.
आयपीएलमधील लखनौ सुपरजायंट्स संघानेही पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. निकोलस पुरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बडोनी आणि मोहसिन खान यांचा समावेश कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने एकूण चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. दिल्लीच्या रिटेन्शनमध्ये ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि अभिषेक पोरेल यांच्या नावाचा समावेश आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने एकूण तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना संधी देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण
आमदार जयश्री जाधवांचा काँग्रेसला रामराम; शिवधनुष्य घेतले हाती
बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक
दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा
राजस्थान रॉयल्स संघाने पुढील हंगामासाठी एकूण सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश कायम असलेल्या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एकही RTM शिल्लक नाही. गुजरात टायटन्स संघाने एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. या पाच खेळाडूंमध्ये शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान आणि राहुल तेवतिया यांचा समावेश आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकूण सहा खेळाडूंना कायम ठेवले आहे. सुनील नरेन, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग यांचा या सहा खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर, पंजाब किंग्स संघाने सर्वात कमी म्हणजेच दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांना पंजाबने कायम ठेवण्यात आले आहे.