पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी कच्छ भागातील बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. जवानांना मिठाई भरवत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळीच नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, भारत आपल्या सीमेमधील एक इंच भागाची देखील तडजोड करू शकत नाही आणि आम्हाला आमच्या सैनिकांच्या निर्धारावर विश्वास आहे.
“आज भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाबाबत तडजोड करू शकत नाही आणि म्हणूनच आमची धोरणे आमच्या सशस्त्र दलांच्या संकल्पाशी सलंग्न आहेत. आम्हाला आमच्या शत्रूच्या शब्दांवर नव्हे तर आमच्या सैनिकांच्या निर्धारावर विश्वास आहे,” असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. गुजरातच्या कच्छमध्ये दिवाळीच्या निमित्ताने बोलत असताना नरेंद्र मोदींनी हा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांच्या शौर्याचेही कौतुक केले आणि ते म्हणाले की, “आपल्या मातृभूमीची सेवा करणे ही एक उत्तम संधी आहे. जेव्हा राष्ट्र तुमचा अटल संकल्प, तुमचे अविचल शौर्य आणि अतुलनीय शौर्य पाहतो तेव्हा आम्हाला सुरक्षित असल्याची जाणीव होते. जेव्हा जग तुम्हाला पाहते तेव्हा ते यातून भारताचे सामर्थ्य पाहते आणि शत्रू त्यांच्या कपटी योजनांचा अंत पाहतात त्यात पाहतात,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीसह आत्मनिर्भर उपक्रमाच्या सहाय्याने देशाने बरीच सकारात्मक गती पाहिली आहे यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. आज भारत स्वतःची पाणबुडी तयार करत आहे. आपले तेजस लढाऊ विमान हवाई दलाचे सामर्थ्य बनले आहेत. यापूर्वी, भारत हा शस्त्रास्त्रे आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, आज भारत जगातील अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. एकविसाव्या शतकातील गरजा लक्षात घेऊन, आज आम्ही आमच्या सैन्याला सुसज्ज करत आहोत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा :
मनोज जरांगेंची तुलना थेट गांधी आणि आंबेडकारांशी
सैन्य मागे घेतल्यानंतर दिवाळीनिमित्त भारत- चीन सैनिकांमध्ये मिठाईची देवाणघेवाण
आमदार जयश्री जाधवांचा काँग्रेसला रामराम; शिवधनुष्य घेतले हाती
बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक
आपले राष्ट्र एक जिवंत चेतना आहे, ज्याची आपण आई म्हणून पूजा करतो. आपल्या सैनिकांच्या परिश्रम आणि बलिदानामुळेच आज देश सुरक्षित आहे, नागरिक सुरक्षित आहेत. सुरक्षित राष्ट्रच प्रगती करू शकते. म्हणूनच, आज जेव्हा आपण विकसित भारताच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल करत आहोत, तेव्हा तुम्ही सर्वजण या स्वप्नाचे रक्षक आहात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.