आज देशात पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहिर होत आहेत. विविध राज्यांत वेगवेगळे पक्ष जिंकताना दिसत आहे. विजयी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कोविड-१९च्या निर्बंधांना हरताळ फासून विजयी मिरवणुका काढल्याने निवडणुका आयोगाने सक्त नाराजी व्यक्त केली आहे.
देशात सध्या कोविडचा हाहाकार माजला आहे. त्यातचा आज पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत आहेत. आजच्या दिवशी मतमोजणी आहे, आणि विजयी उमेदवार विजय मिरवणुका काढू शकतात, हा विचार करून निवडणुक आयोगाने मिरवणुकांवर बंदी घातली होती. परंतु आज तरीही या सुचनेचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
आसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय निश्चित
भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी
निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ
यावर नाराजी व्यक्त करत निवडणुक आयोगाने सर्व राज्यांच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले आहे. ज्यात निवडणुक आयोगाने अशा प्रकारच्या मिरवणुका तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच यासाठी कारणीभूत असलेल्या एसएचओ अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई आणि शिस्तभंगाची कारवाई तात्काळ सुरू करण्याचे आदेश देखील निवडणुक आयोगाने दिले आहेत.
देशातील वाढत्या कोविडमुळे हा खबरदारीचा उपाय घेण्यात आला होता. त्याबद्दल भाजापचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी निवडणुक आयोगाचे अभिनंदन देखील केले होते. त्याबरोबरच भाजप या आदेशाचे पूर्ण पालन करेल असे आश्वासन देखील दिले होते.