२८ ऑक्टोबरच्या रात्री जेएनयूत जनरल बॉडी मीटिंग सुरु असताना प्रभू श्रीरामाबद्दल डाव्यांकडून अभद्र टिप्पणी केली गेली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही अपमान केला गेला. डाव्यांची ही मुजोरी सहन न करता अभाविपने सभा बंद पाडली. आधी माफी मागा मगच सभा सुरू करून देऊ या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याने ती सभा डाव्यांनी रद्द केली पण माफी काही मागितली नाही.
याच सगळ्या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये होणाऱ्या अंतर्गत कमिटी निवडणुकात हा मुद्दा प्रकर्षाने उचलला गेला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून शांभवी थिटे उभी राहत आहे. ही कमिटी लैंगिक शोषण आणि लैंगिकतेच्या मुद्द्यावर काम करते.
या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान या निवडणुकीत प्रभू श्रीरामाचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान हा कळीचा मुद्दा राहणार आहे. मर्यादापुुषोत्तमाकडून स्त्री पुरुषाच्या पलीकडची समानता आपण शिकावी असे डाव्यांना कधीही वाटणार नाही.
हे ही वाचा:
५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी
मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये
भाजपाचे अमित ठाकरेंना पाठींबा देण्याचे मत; मुख्यमंत्र्यांच्याही त्याचं भावना
दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान भारत लागू न केल्याने पंतप्रधान नाराज
प्रभू श्रीरामला ‘नीच’ म्हणणाऱ्या डाव्यांच्या विरोधात या वर्षी जेएनयूत होणाऱ्या आयसी निवडणूकीमध्ये अभाविपची वैचारिक धुरा पुष्कर आणि स्नेहा कीर्ती आणि शांभवी सांभाळत आहे.
जेएनयू मध्ये आता या निवडणुकीसाठी रॅली निघत आहेत. तिथे जय श्रीरामच्या घोषणा निनादत आहेत. महान विभूतींचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या जात आहेत.
प्रभू श्रीरामासाठी ५०० वर्षे संघर्ष करावा लागला आणि पाच वर्षे आम्ही संघर्ष करू आम्हाला अडवून दाखवा, असे आव्हान डाव्याना दिले जात आहे.