30 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरधर्म संस्कृती५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी

५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत शरयू नदीच्या काठावर होणार विशेष आरती

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणानंतर अयोध्येत यंदा पहिली दिवाळी साजरी होत आहे. ५०० वर्षांनंतर मोठ्या थाटात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीसाठी अयोध्या नगरी नटून थटून तयार आहे. अयोध्येत आज दीपोत्सवाचा शुभारंभ झाला. 

दिवाळीनिमित्त अयोध्येतील रस्ते सजले आहेत. शहरातील गल्लीबोळपासून शरयू नदीतील घाटापर्यंत सर्वत्र झगमगाट पसरला असून भाविकांमध्ये वेगळीच ऊर्जा दिसून येत आहे. अयोध्या नगरीत भगवान रामांचे चरित्र दाखवणारे देखावे साकारण्यात येणार आहेत. पर्यटन विभागानेही अयोध्येच्या सुशोभिकरणाची जबाबदारी एजन्सींवर सोपवली आहे. यावेळी अयोध्येत प्रदूषणमुक्त हरित फटाके फोडण्यात येणार आहे. शिवाय शरयू नदीच्या काठी संध्याकाळी फटाक्यांसह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीताचे सादरीकरण केले जाणार आहे.

रामकथा पार्कजवळील हेलिपॅडवर पुष्पक विमानाने भगवान राम यांचे आगमन होण्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः त्यांचे स्वागत करतील. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत शरयू नदीच्या काठावर हजारो लोक विशेष आरती करणार आहेत.

अयोध्येतील शरयू घाट आणि श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी २८ लाख दिवे प्रज्वलित केले गेले. यासाठी विशेष स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. अयोध्येतील ५५ घाटांवर हे दिवे लावण्यात आले आहेत. प्राणप्रतिष्ठेनंतरची पहिली दिवाळी भव्यदिव्य करण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडणार नसल्याचे या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवकांचे म्हणणे आहे. या कामात ३० हजार स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

हे ही वाचा : 

पूर्व लडाख सीमेवरील डेपसांग, डेमचोक पॉईंट्सवरून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण

राज ठाकरे म्हणाले, राज्यात पुढचा मुख्यमंत्री भाजपचा!

पाईपलाईन खोदकामादरम्यान सापडले ‘ब्रिटीश कालीन बॉम्ब’

नवी मुंबईच्या सोसायटीत मुस्लिमांकडून दिवाळीसाठी रोषणाई करण्यास जोरदार विरोध

अयोध्येत प्रज्वलित होणाऱ्या दिव्यांसाठी ९२ हजार लिटर मोहरीचे तेल वापरण्यात येणार आहे. मंदिराच्या आत लावले जाणारे दिवे काजळी आणि धूर सोडणार नाहीत. यामुळे मंदिराच्या भिंती आणि दगडांवर डाग न पडण्यास मदत होणार आहे. मंदिरात दिव्यांशिवाय फुलांची सजावटही करण्यात आली आहे. राम मंदिर ५० क्विंटल फुलांनी सजवण्यात येत आहे. अयोध्येतील उत्सावाच्या वातावरणात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा