गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल
पश्चिम बंगालपर्यंत जाऊ नका, भाजपा नेते तिथले राजकारण सांभाळण्यास सक्षम आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीबाबत मतप्रदर्शन करणे म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात नाचण्यासारखेच आहे. तशी सवय या दोन्ही पक्षांना आहे, अशी बोचरी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केली आहे. यासंदर्भात खरे तर काँग्रेसच्या नेत्यांचे मत घ्या, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या दोन्ही पक्षांवर हल्लाबोल केला. दरम्यान शरद पवार यांनी द्रमुक नेते स्टॅलिन यांचेही तामिळनाडूमधील यशाबद्दल कौतुक केले आहे. त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट त्यांनी केले आहे.
आसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय निश्चित
भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी
निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूलने भाजपापेक्षा आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असताना काँग्रेसच्या प्रतिक्रिया कुठूनही येताना दिसत नाहीत. त्याठिकाणी ज्यांचा पश्चिम बंगालशी संबंधही नाही, त्यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटताना पाहायला मिळते आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील कल पाहता महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचे नेते हे तृणमूल काँग्रेसच्या यशाने भारावून गेले आहेत. त्यांच्याकडून तृणमूलचे अभिनंदन करण्यासाठी अहमहमिका लागली आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मात्र या संपूर्ण चर्चेतूनच पळ काढला आहे. त्यांच्याकडून या निवडणूक निकालांवर कोणतीही प्रतिक्रिया येताना दिसत नाही. एकूणच जे प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले आहेत, त्यांच्या प्रतिक्रियांपेक्षा जे सहभागीही झाले नाहीत, त्यांच्या प्रतिक्रिया उदंड झाल्या आहेत.