विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. उमदेवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवार आप-आपल्या मतदार संघात जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.
याच दरम्यान, विविध वृत्त वाहिन्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या मुलखाती घेत आहेत. निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, मुख्यमंत्री पदासाठी मुख्य चेहरा कोण, कोणासोबत युती कराल, असे विविध प्रश्न विचारून नेत्यांच्या मनातील गोष्टी बाहेर काढल्या जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने प्रमुख नेत्यांची मुलाखत घेतली, ज्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना बोलवण्यात आले होते. यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे ही वाचा :
भाजपाचे अमित ठाकरेंना पाठींबा देण्याचे मत; मुख्यमंत्र्यांच्याही त्याचं भावना
नवी मुंबईच्या सोसायटीत मुस्लिमांकडून दिवाळीसाठी रोषणाई करण्यास जोरदार विरोध
मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिकांना तिकीट देऊन देशाचा विश्वासघात केलाय
मुलखाती दरम्यान विविध विषयांवर भाष्य करत असताना राज ठाकरेंना पुढील मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, पुढील मुख्यमंत्री भाजपचा होईल असे वाटत आहे आणि आमची साथ असणार, असे राज ठाकरे म्हणाले.
या मुलाखत कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची भेट झाली. राज ठाकरेंच्या भेटीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटरवर फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, भाजपाला मनसे साथ देणार असल्याचे राज ठाकरेंच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे.