नवी मुंबईच्या तळोज्यातील पंचानंद सोसायटीत दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यास त्याच सोसायटीतील मुस्लिमांनी जोरदार विरोध केला आहे. सोसायटीतील हिंदू महिलांशी या सोसायटीतील मुस्लिमांनी भांडण केले. त्याचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत असून याविरोधात ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
या सोसायटीतील हिंदू कुटुंबांनी इमारतीत रोषणाई करण्याचे ठरविले पण सदर मुस्लिमांनी त्यांना रोषणाई करू देण्यास विरोध केला. त्यावरून सदर हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुष यांच्यात जोरदार खटका उडाला. त्यात मुस्लिम पुरुषांनी या महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली. विद्युत रोषणाई करून दिलीच जाणार नाही, अशा धमक्याही या मुस्लिम पुरुषांनी दिल्या.
यासंदर्भात अशी माहिती समोर आली की, या सोसायटीने कोणताही उत्सव सोसायटीच्या आवारात साजरा करायचा नाही, असा निर्णय घेतल्याचे कळते. त्याची सुरुवात मागे झालेल्या बकरी ईदच्या निमित्ताने झाली होती. त्यावेळी या सोसायटीतील काही सदस्यांनी आपल्या घरात बकरा कापण्यासाठी आणला होता. त्याला हिंदू सदस्यांनी विरोध केला. बकरा इथे सोसायटीत कापू नका, असा आक्षेप त्यांनी घेतला होता. त्यावरून मग सोसायटीच्या आवारात कोणताही उत्सव साजरा करायचा नाही, असे ठरल्याचे सांगण्यात येते.
हे ही वाचा:
दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान भारत लागू न केल्याने पंतप्रधान नाराज
मुंबई- नाशिक महामार्गावर गाडीत सापडले दोन कोटी रुपये
लबाडाघरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही !
ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची विद्यापीठ स्पर्धात भरारी
त्यामुळे यावेळी दिवाळीला विद्युत रोषणाई केली गेल्यावर त्याला सोसायटीतील या मुस्लिम सदस्यांनी विरोध केला. तेव्हा हिंदू महिलांनी आम्ही रोषणाई करणारच अशी भूमिका घेतली. त्यावेळी या मुस्लिम पुरुष आणि हिंदू महिलांचे जोरदार भांडणही झाले. तेव्हा सदर मुस्लिम सदस्य हे हिंदू महिलांना शिवीगाळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. एका महिलेने याचा व्हीडिओ रेकॉर्ड केल्यावर तिच्या अंगावर धावून जाताना एक मुस्लिम सदस्य दिसत आहे. व्हीडिओ काढू नको, अशी दमदाटी तो करत आहे.
आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले असून तिथे यासंदर्भात कोणते पाऊल उचलले जाते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.