आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. १२६ जागा असलेल्या विधानसभेसाठी सुरु असलेल्या मतमोजणीमध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी ७५ जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे तर विरोधी पक्ष काँग्रेस ४२ जागांवर आघाडीवर आहे.
हम सरकार बनाएंगे यह स्पष्ट है। जनता ने हमें आशीर्वाद दिया है। अभी आखिरी गिनती तक इंतजार करना पड़ेगा। अभी ट्रेंड हमारे पक्ष में है: असम के मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल pic.twitter.com/94Aau8yhxx
— ANI_HindiNews (@AHindinews) May 2, 2021
सुरुवातीच्या कलांनुसार एनडीएचे मुख्यमंत्री असलेले सर्वानंद सोनोवाल हे आपली सत्ता कायम ठेवतील असं दिसतंय. आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला असून आम्हीच सरकार बनवणार हे स्पष्ट आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आसाममध्ये २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत युपीएला २६ आणि एनडीएला ८६ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्षांना १४ जागा मिळाल्या होत्या.
आसामला २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल असे तीन टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. आसाममध्ये एनडीए आणि यूपीएमध्ये लढत होती. कॉंग्रेस येथे महाआघाडी करून उतरली होती. एआईयूडीएफ, बीपीएफ, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (माले), आंचलिक गण मोर्चा (एजीएम), आरजेडी, आदिवासी नॅशनल पार्टी (एएनपी) आणि जिमोचयन (देओरी) पीपुल्स पार्टी (जेपीपी) सोबत होते.
हे ही वाचा:
नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर
निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ
भाजपाचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि मंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांनी आसाममध्ये जोरदार प्रचार केला होता. यावेळी प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी, सत्ता मिळाल्यावर भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल? या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं होतं.