देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळावा अंतर्गत तरुणांना नियुक्ती पात्रांचे वाटप केले आहे. मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळावा अंतर्गत नवनियुक्त तरुणांना ५१ हजार हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्यांची दिवाळी भेट दिली. रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील ५१ हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे दिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी नियुक्ती पत्र मिळालेल्या तरुणांनाही संबोधित केले. यासोबतच त्यांनी युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रोजगार मेळावा हा रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. रोजगार मेळावे तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम करेल. महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासारख्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये केंद्र सरकारमध्ये नवीन भरतीसह ४० ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला जाईल.
हे ही वाचा :
भाजपाची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत १४८ जागांवर दिले उमेदवार!
केरळमध्ये मंदिरातील उत्सवादरम्यान फटाक्यांचा भीषण स्फोट, १५० हून अधिक जखमी
धनत्रयोदशी: आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारी देवता धन्वंतरी
हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटाच्या उमेदवाराने घेतली माघार
iGOT कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन मॉड्यूल ‘कर्मयोगी प्ररंभ’ द्वारे पायाभूत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. १४०० हून अधिक ई-लर्निंग कोर्सेस उपलब्ध आहेत जे भरती करणाऱ्यांना त्यांच्या भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करतील रोजगार मेळा हे देशातील रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे.