देशभरात दिवाळीचा उत्साह दिसत असून केरळमध्ये मात्र या दिवाळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. केरळच्या कासारगोडमध्ये एका कार्यक्रमात फटाक्यांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. कासरगोड येथे टेंपल फेस्टिव्हलदरम्यान आतिषबाजी सुरू असताना मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १५० हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री नीलेश्वरम जवळील एका मंदिरात ही दुर्दैवी घटना घडली. सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्फोटामुळे आसपासच्या परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. तसेच, घटनास्थळी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.
केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील नीलेश्वरम येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. फटाक्यांना आग लागल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तर आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Kerala: Over 150 injured in fireworks accident in Kasargod
Read @ANI Story | https://t.co/OzW08r8d1s#Kerala #fireworksaccident pic.twitter.com/epgXoFX4xy
— ANI Digital (@ani_digital) October 29, 2024
हे ही वाचा :
MUDA मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कर्नाटकमध्ये सहापेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी
पोलिसांनी कारवाई करताच केली मारहाण
शरद पवारांची चौथी यादी; अनिल देशमुखांऐवजी त्यांच्या मुलाला उमेदवारी
बोरिवलीतून संजय उपाध्याय, वसईतून स्नेहा दुबे, तर सावनेरमधून आशिष देशमुख!
या मंदिरात वार्षिक कलियाट्टम उत्सव साजरा केला जातो. कार्यक्रमासाठी फटाक्यांची मोठी ऑर्डर देण्यात आली होती. सर्व फटाके एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले होते. दरम्यान, रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक फटाके फुटू लागले आणि काही वेळातच धुराचे लोळ दिसू लागले. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्दैवी घटनेतील बाधितांना मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच फायरर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बऱ्याच प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.