उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय विरोधक आहेत, पण वैयक्तिक शत्रू नाहीत, असे शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते. तसेच अमित ठाकरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना उमेदवार मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एबीपी माझाच्या मुलाखतीत बोलताना संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या पद्धतीने मी विरोधक मानत नाही. देवेंद्र फडणवीस राजकीय विरोधक जरूर आहेत, याचा अर्थ ते दुश्मन नाहीयेत. आम्ही व्यक्तिगत कधीच घेत नाही.
उद्धव ठाकरेंनी एकदा भाषणात देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, ‘तू तर राहशील नाहीतर मी तर राहीन’ म्हणाले होते, यावरून संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, ही राजकारणाची गोष्ट आहे, राजकारणामध्ये तू तर राहशील नाहीतर मी तरी राहीन असे त्यांनी म्हटले होते.
यंदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, मविआचा मुख्यमंत्री होईल आणि महाराष्ट्राला हवा असलेला चेहरा मुख्यमंत्री पदावर विराजमान होईल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?
पंजाबच्या रेचेल गुप्ताने ‘मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४’ चा जिंकला ‘ताज’
वयाच्या ६ व्या वर्षी घडला गुन्हा, १७ वर्षाची झाल्यावर केली तक्रार ,४ तासात मौलवीला केले गजाआड!
बाबा सिद्दीकी प्रकरणी अटक केलेला आरोपी सुजित सुशील सिंगकडून धक्कादायक माहिती उघड!
विधानसभा निवडणुकीच्या मैदानात माहीम मतदार संघातून उभे राहिलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्याविरोधातील उमेदवारावरून संजय राऊत यांनी भाष्य केले. अमित ठाकरे यांच्याविरोधात शिवसेना उबाठाचे सदा सरवणकर हे आहेत.
दरम्यान, सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली अशी चर्चा होत असल्याचे विचरताच, राऊत म्हणाले, माघार घेणे ही त्यांची इच्छा, आम्ही कशासाठी माघार घेवू?, त्यांच्याविरोधात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत का?, ज्यामुळे हा निर्णय घ्यावा. तरुण मुलांना लढू द्या, राजकारणात किती त्रास आहे हे त्यांनाही कळू द्या, तेव्हाच त्यांचे नेतृत्व उभे राही शकतात, असे संजय राऊत म्हणाले.