पाकिस्तानमधील अशांत प्रांत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुचिस्तानमधून बलुच लोकांच्या लापता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आठ बलुच विद्यार्थ्यांचे १६ ऑक्टोबर रोजी कराचीतून अपहरण करण्यात आले होते. यातील सहा विद्यार्थी आपापल्या घरी परतल्याचे वृत्त आहे. कराची शहरातील गुलिस्तान-ए-जौहर शेजारील त्यांच्या निवासस्थानातून आठ बलूच विद्यार्थी बेपत्ता झाले होते. यानंतर यातील सहा आपल्या घरी परतल्याचे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इश्फाक, शहजाद, बेबर्ग अमीर, झुबेर, कंबर अली आणि सईदुल्लाह या विद्यार्थ्यांना बलुचिस्तानमधील उथलमध्ये पोलिसांनी सोडले. मात्र, हनिफ आणि शोएब अद्याप बेपत्ता आहेत, अशी माहिती आहे. बेपत्ता विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याचा भाऊ वजीर अहमद यांनी माध्यमांना सांगितले की, शुक्रवारी पहाटे १ च्या सुमारास उथल पोलीस ठाण्यात आठ पैकी सहा विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.
या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी दावा केला होते की, १६ ऑक्टोबर रोजी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींनी हे विद्यार्थी राहत असलेल्या एका घरावर छापा टाकून या आठ विद्यार्थ्यांना उचलले होते. नंतर, त्यांनी सिंध उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली ज्याने अखेरीस गृह सचिव, पोलिस महानिरीक्षक आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावली आणि पोलिसांना ४ नोव्हेंबरपर्यंत अटक केलेल्या लोकांना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
हे ही वाचा:
संजू बनलेल्या सलीमने हिंदू प्रेमिकेची हत्या करत सहा फूट जमिनीत गाडले!
भगव्या ध्वजाला नमन करत अतुल भातखळकरांच्या प्रचाराला प्रारंभ!
फटाके फोडण्यावरून भिलवाडामध्ये हिंसाचार
फरार झालेल्या काँग्रेस महिला नेत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
बलुचिस्तानमधील प्रमुख बलुच मानवाधिकार संघटना, द बलुच याकजेहती समितीने (बीवायसी) सांगितले जाते की, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि मदरशांमध्ये शिकणाऱ्या बलुच विद्यार्थ्यांना बळजबरीने गायब करून अंधाऱ्या कोठडीत ठेवले जात आहे. बलुच विद्यार्थ्यांचे १६ ऑक्टोबर रोजी कराचीतून अपहरण करण्यात आले होते. कायदा, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. द बलुच याकजेहती समितीने पाकिस्तान सरकारच्या हातून बलुच नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध जागतिक कारवाईची मागणी केली होती.