महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसपूस सुरू असतानाचं शनिवारी सकाळी ठाकरे गट आणि काँग्रेसने त्यांची दुसरी यादी जाहीर केल्यावर आता शरद पवार गटाने देखील आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
शराद पवार गटाकडून दुसऱ्या यादीमध्ये एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसरी यादी समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे एकूण ६७ उमेदवार घोषित झाले आहेत.
हे ही वाचा..
भगव्या ध्वजाला नमन करत अतुल भातखळकरांच्या प्रचाराला प्रारंभ!
फटाके फोडण्यावरून भिलवाडामध्ये हिंसाचार
बांगलादेशमध्ये सनातन जागरण मंचची भव्य रॅली
महायुती अमित ठाकरेंना समर्थन देणार?
एरंडोल – सतीश अण्णा पाटील, गंगापूर – सतीश चव्हाण, शहापूर – पांडुरंग बरोरा, भूम-परांडा – राहुल मोटे, बीड – संदीप क्षीरसागर, आर्वी – मयुरा काळे, बागलान – दीपिका चव्हाण, येवला – माणिकराव शिंदे, सिन्नर – उदय सांगळे, दिंडोरी – सुनीताताई चारोसकर, नाशिक पूर्व – गणेश गिते, उल्हासनगर – ओमी कलानी, जुन्नर – सत्यशील शेरकर, पिंपरी – सुलक्षणा शिलवंत, खडकवासला – सचिन दोडके, पर्वती – अश्विनीताई कदम, अकोले – अमित भांगरे, अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर, माळशिरस – उत्तम जानकर, फलटण – दीपक चव्हाण, चंदगड – नंदिनीताई कुपेकर, इचलकरंजी – मदन कारंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.