उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरातील स्थानिक न्यायालयाने गेल्या महिन्यापासून फरार असलेल्या काँग्रेस नेत्या रोशनी कुशल जयस्वाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट गुरुवारी जारी केले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यावर हल्ला केला होता. त्याचा व्हिडीओ समोर आला त्यात त्यांचा पती आणि भाऊसुद्धा आहे.
आपल्या आदेशात दिवाणी न्यायाधीश युगल शंभू यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम ८४ अंतर्गत रोशनी कुशल जैस्वाल विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. पोलिसांच्या एका पथकाने वाराणसीच्या भेलपूर परिसरातील त्यांच्या घरी भेट दिली आणि भिंतीवर न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडली आहे. रोशनी कुशल जैस्वाल आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा..
ठाकरे गटानंतर काँग्रेसचीही दुसरी यादी जाहीर; एकूण ७१ जागांवर दिले उमेदवार
पूर्व लडाखमधील डेपसांग आणि डेमचोकमध्ये लष्करी संरचना हटवण्यास सुरुवात
माविआमधील जागवाटपाच्या धुसपुशीत ठाकरे गटाचे ८० उमेदवार जाहीर, ६५ नंतर आणखी १५ घोषित
इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले
१५ सप्टेंबर रोजी रोशनी कुशल जयस्वाल वाराणसीच्या पांडेपूर परिसरातील प्रेमचंद नगर कॉलनीत राजेश कुमार नावाच्या भाजप कार्यकर्त्यावर शारीरिक हल्ला करताना दिसल्या होत्या. पिवळ्या रंगाचे कपडे घातलेल्या पीडितेला दोन गुंडांनी रोखले तर काँग्रेस नेत्या आणि तिच्या पतीने पीडितेला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यादरम्यान त्यांनी राजेशची पत्नी आणि मुलीलाही मारहाण केली.
बोल हिंदुस्तान या पोर्टलसाठी काम करणारे ‘पत्रकार’ समर राज यांनी व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि आरोप केला की भाजप कार्यकर्ता सोशल मीडियावर महिलांना ‘बलात्काराच्या धमक्या’ देत असे. त्यानंतर राजेशच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि दोषींना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. काँग्रेस नेत्याचा पती आणि भावाला तातडीने अटक करण्यात आली, तर रोशनी पळून जाण्यात यशस्वी झाल्या. तेव्हापासून त्या फरार आहेत.
वाराणसी न्यायालयाने फरार झाल्याबद्दल त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर तिने ‘पीडित कार्ड’ खेळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. ३ मिनिटांच्या एका व्हिडिओमध्ये रोशनी कुशल जैस्वाल यांनी कबूल केले की, त्यांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केल्यानंतर त्या फरार आहेत. आणि पीडित राजेश कुमार हा बलात्काराचा आरोपी असल्याचा कोणताही पुरावा नाही.
याबद्दल जम्मू आणि काश्मीर कॉंग्रेस सेवादलाच्या अधिकृत हँडलने ट्विट केले आहे की, ही वेदनादायक कथा वाराणसीची आहे. रोशनी कुशल जैस्वाल यांचा एकच गुन्हा आहे की तिने तिच्यावर बलात्काराची धमकी देणारे भाजप नेते राजेश सिंह यांच्या विरोधात आवाज उठवला. पती, भाऊ, इतर ५ जण ४० दिवस तुरुंगात आहेत, त्यांचे घर जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. असे ट्विट करण्यात आले आहे.