राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचं पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाल्या असून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे आणि तपासणी चौकी उभारण्यात आल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात तसेच पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. अशातच पुण्यात नाकाबंदी दरम्यान कोट्यवधींचे सोने पोलिसांनी पकडले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. सातारा रस्त्यावर सकाळी एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात सोन्याचे दागिने सापडले आहेत. याची किंमत तब्बल १३८ कोटी असल्याचे समोर आले आहे. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे नेलं जात होतं? यामागे कोणाचा हात आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे १३८ कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दुसऱ्या प्रकरणात पुण्यात खेड- शिवापूर परिसरात एका गाडीतून पाच कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे गोंधळ निर्माण झाला होता.
हे ही वाचा :
जेएनयूमध्ये होणारी इराण, पॅलेस्टाईन, लेबेनॉनच्या भारतातील राजदूतांची व्याख्याने रद्द
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!
भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात
झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यापैकी गेल्या २४ तासांत ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.