नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘भानू’ म्हणून ओळखला जाणारा, अनोल बिश्नोई बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळून गेला असून तो गेल्या वर्षी केनियामध्ये आणि यावर्षी कॅनडामध्ये दिसून आला होता.
२०२२ मध्ये पंजाबचा गायक सिद्धू मोसेवाला यांच्या हत्येप्रकरणी तो वॉन्टेड आहे. अनमोल बिश्नोईवर १८ गुन्हे दाखल आहेत. एनआयएने अनमोल बिश्नोईचा ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समावेश केला आहे. याआधी, सोशल मीडियावर या घटनेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर १४ एप्रिल रोजी सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी केले आहे.
हे ही वाचा :
भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात
झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज
जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
पुण्यातील या तिघांनी नाकारली होती बाबा सिद्दीकीच्या हत्येची सुपारी
मुंबई पोलिसांनी सांगितले की, अनमोल बिश्नोई १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या नेमबाजांच्या संपर्कात होता. तिघांनी राष्ट्रवादी नेत्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, अनमोल बिश्नोई आरोपींच्या थेट संपर्कात होता. तसेच कॅनडा आणि यूएसमधून काम करत असताना आरोपीच्या संपर्कात राहण्यासाठी त्याने स्नॅपचॅट या सोशल मीडिया ऍप्लिकेशनचा वापर केला होता.
दरम्यान, बाबा सिद्दीकिंच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे, ज्यात दोन शूटर आणि शस्त्रे पुरवठा करणाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.